नेवासा येथील राहुल आठरे यांना ZP लाइव्ह एज्युकेशन तर्फे राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, February 12, 2021

नेवासा येथील राहुल आठरे यांना ZP लाइव्ह एज्युकेशन तर्फे राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार. | C24Taas |

नेवासा येथील राहुल आठरे यांना ZP लाइव्ह एज्युकेशन तर्फे राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्कार.

नेवासा - लॉकडाऊन च्या काळात शाळा बंद तरीही शिक्षण सुरू ठेवण्यासाठी राज्यामध्ये ऑनलाइन शिक्षणाचा मार्ग काढत झेड पी लाईव्ह प्रस्तुत ”घरातच सुरू झाली.ऑनलाइन शाळा” या उपक्रमांतर्गत राज्यातील चारशे शिक्षकांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. यापैकी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेवासा खुर्द मुले येथील टेक्नोसॅव्ही शिक्षक राहुल आठरे यांचा 

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
उल्लेखनीय कार्याबद्दल शालेय शिक्षण राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ नामदार बच्चू कडू यांच्या हस्ते राज्यस्तरीय शिक्षक गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
औरंगाबाद येथील तापडिया नाट्य मंदिर येथे जिल्हा परिषद लाईव्ह एज्युकेशन ॲप लॉन्च सोहळा पार पडला. घरातच सुरू झाली ऑनलाईन शाळा याद्वारे विद्यार्थ्यांना राज्यातील विविध शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले व 
यासाठी नितीन अंतरकर, रूपाली अंतरकर व गजेंद्र बोंबले या शिक्षकांच्या अथक प्रयत्नाने व इ कट्टा च्या सहकार्याने अँप साकारले. व याचे उद्घाटन शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी औरंगाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, विभागीय शिक्षण उपसंचालक अनिल साबळे, शिक्षणाधिकारी सुरजप्रसाद जायस्वाल आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
झेडपी लाइव्ह एज्युकेशन चे कार्य ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असल्याचे प्रतिपादन यावेळी बच्चू कडू यांनी केले.राज्यातील सुमारे चारशे शिक्षकांनी एकत्र येत युट्युब चॅनल ते ॲप पर्यंत मोफत ऑनलाईन शिक्षण सुरू केले. त्यामध्ये लाईव्ह पाठ,गंमत शाळा, रोबोटिक्स,जर्मन-जपानी भाषा,ई साहित्य,ऑडीओ बुक्स याचा समावेश अँप मध्ये आहे.
कोरोना काळातील गुगल फॉर्म द्वारे 
जनजागृती,विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी गृहभेटी व हार्डकॉफी वाटप,ऑनलाइन-ऑफलाईन अध्यापन,गुगल टेस्ट द्वारे मूल्यमापन,विविध विषयांच्या ऑनलाइन कार्यशाळा,लोकसहभाग आदी कार्याबद्दल आठरे यांचे सभापती रावसाहेब कांगुणे, गटशिक्षणाधिकारी सुलोचना पटारे,विस्तार अधिकारी शिवाजी कराड,केंद्रप्रमुख मीरा केदार,मुख्याध्यापक शकिला खान व सर्व सहकारी शिक्षक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी ,ग्रामस्थ पालक यांनी अभिनंदन केले आहे.


नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment