नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, अपघातात ५ जण जागीच ठार. | C24TAAS | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, February 21, 2021

नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, अपघातात ५ जण जागीच ठार. | C24TAAS |

नेवासा तालुक्यात देवगड फाट्याजवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात, अपघातात ५ जण जागीच ठार.

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.

नेवासा तालुक्यात नगर  - औरंगाबाद महामार्गावर देवगड फाटा जवळ स्वीप्ट कार व ट्रॅव्हल्सच्या झालेल्या भीषण अपघातात कार मधील ५ जणांचा जागीच मृत्यु झाल्याची दुर्दवी घटना सोमवारी दि.२२ रोजी रात्री २ वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी आहे की सोमवारी दि २२ रोजी रात्री २ च्या सुमारास औरंगाबादकडून नगरच्या दिशेने जात असलेल्या ट्रॅव्हल बस (क्रमांक एमएच १९ वाय ७१२३) व अहमदनगरकडून औरंगाबाद कडे जात असलेल्या स्विप्ट कार(क्रमांक एमएच २१ बीएफ ७१७८) यांच्यामध्ये देवगड फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात कारमधील पाच जण जागीच ठार झाले आहे.मयत जालना जिल्ह्यातील मंठा येथील असल्याचे समजते. स्वीप्ट कार ट्रॅव्हल्स च्या समोरील बाजूस घुसल्याने स्वीप्ट कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

अपघाताची माहिती समजताच पोलीस उपनिरीक्षक भरत दाते,पोलिस नाईक अशोक नागरगोजे,पोलीस नाईक बबन तमनर,पोलीस कॉन्स्टेबल दिलीप कुऱ्हाडे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेवुन स्थानिकांच्या मदतीने मदतकार्य केले व जखमींना ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे हलवले परंतु सर्व ५ ही जण उपचारापूर्वीच मयत झाले असून पुढील कार्यवाही नेवासा पोलीस करत आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment