नेवासा - अचानक वाहनास आग ; युवकांमुळे गाईंचे वाचले प्राण. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 3, 2021

नेवासा - अचानक वाहनास आग ; युवकांमुळे गाईंचे वाचले प्राण. | C24Taas |

नेवासा - अचानक वाहनास आग ; युवकांमुळे गाईंचे वाचले प्राण. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील नगर-औरंगाबाद रस्त्यावरील वडाळा बहिरोबा येथे दोन गायी घेऊन चाललेल्या वाहनाने अचानक पेट घेतला. युवकांनी आग तातडीने विझविल्याने मोठा अनर्थ टळला.
योगेश काळे हे सोनई येथून एम एच २० डीई ४८९४ या मालवाहतूक वाहनातून दोन गायी घेऊन गंगापुर तालुक्यातील बागडीला जात असताना, वडाळा बहिरोबा येथे या वाहनाने अचानक पेट घेतला. आधार प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयवंत मोटे, सदस्य शंकर मोटे, रवी सावंत, संतोष मोटे व अन्य युवकांनी पाणी मारून आग विझविली.


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.


या घटनेत गायींना किरकोळ दुखापत झाली. युवकांनी तातडीने पशुवैद्यकीय सेवा उपलब्ध केली. या वेळी प्रवासी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने जमा झाले होते. आधार प्रतिष्ठानच्या सदस्यांनी हातातील काम बाजूला ठेवत माणुसकीचे दर्शन घडविले. उपस्थितांनी त्यांचे कौतुक केले.❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment