नेवासा - श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गाच्या वतीने करजगाव येथे कृषी प्रदर्शन उत्साहात संपन्न. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, February 5, 2021

नेवासा - श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गाच्या वतीने करजगाव येथे कृषी प्रदर्शन उत्साहात संपन्न. | C24Taas |

  नेवासा - श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक मार्गाच्या वतीने करजगाव येथे कृषी प्रदर्शन उत्साहात संपन्न. | C24Taas |

नेवासा - दिंडोरी प्रणित स्वामी समर्थ मार्गाचे प्रमुख गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व आबासाहेब मोरे यांनी केलेल्या नियोजनानुसार नेवासा तालुक्यातील करजगाव येथे कृषी प्रदर्शन महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाले.


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.

  नेवासा तालुक्यात करजगाव सह,उस्थळ दुमला,बेलपांढरी व आंतरवली या गावात कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.महोत्सवात बालसंस्कार,साहित्य, गर्भसंस्कार,विज्ञान,जनकल्याण योजना,कृषी मार्गदर्शन बरोबरच स्वामी समर्थ मार्गातील अठरा विभागाची सविस्तर माहिती देण्यात आली.ऑनलाईन वधू-वर परिचय मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला.

कृषी शास्रज्ञ डाॅ.अशोक ढगे,माजी कृषी उपसंचालक संभाजी गायकवाड,सामाजिक कार्यकर्ते  डाॅ.करणसींग घुले व पंचायत समिती सभापती रावसाहेब कांगुणे यांनी महोत्सव कार्यक्रमात उपस्थित शेतक-यांना मार्गदर्शन केले.पंच कमेटी व सेवेकरी मंडळाच्या वतीने मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. 

     कृषी महोत्सवात घरगुती खते तयार करण्याचे प्रशिक्षण शेतक-यांना देण्यात आले. शेतीपुरक जोडधंदा,देशी गायीचे संवर्धन, पशुपालन, स्वयंरोजगार व सण उत्सव कसे साजरे करावे याबाबत माहिती देण्यात आली. स्वामी समर्थ पंचकमेटीसह तालुक्यातील सर्व केंद्र व साप्ताहिक केंद्रातील सेवेकरी व भक्तांनी महोत्सव यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment