नेवासा तालुक्यात नगर-औरंगाबाद रस्त्यावर लुटमार करणारे दोन आरोपी अटकेत , शनिशिंगणापुर पोलिसांची कारवाई.
नेवासा तालुक्यात नगर - औरंगाबाद रस्त्यावरील कांगोणी फाटा परीसरातील सुडके महाराज आश्रम जवळ काल मंगळवारी रात्री सत्तर हजाराची रस्तालूट करुन पळालेले आरोपी शनिशिंगणापुर पोलिसांनी अवघ्या दोन तासात अटक केले आहेत. या कारवाईचे तालुक्यात स्वागत होत आहे.
याबाबत पोलिस सूत्राकडून समजलेली माहिती अशी की,मंगळवार दि.२ फेब्रुवारी रोजी रात्री नेवासाफाटा येथुन चांदा गावी मोटारसायकल वरुन जात असताना रविंद्र राजेंद्र कदम राहणार चांदा यांना अडवून गावठी कट्ट्याचा धाक दाखवत दोन तोळे सोन्याची चेन,रोख तेरा हजार 500 रुपये व पंधरा हजाराचा मोबाईल हिसकावून नेला होता.आरोपींनी कदम यांना मारहाण केली होती.
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
याबाबत सहायक पोलिस निरीक्षक सचिन बागुल यांना खबर मिळताच त्यांनी वेळ न घालविता तातडीने आपल्या पथकासह तपासकामी रवाना झाले.कदम यांनी दिलेल्या आरोपीच्या माहितीवरुन खब-यांकडून माहिती घेण्यात आली. टू पल्स रेकार्डवर माहिती तपासत दुसरी लुटमार करण्याच्या तयारीत असताना रात्री दहा वाजता उसाच्या शेतातून नितीन मोहन राशिनकर व वैभव बाबासाहेब घोडके या दोघास पाठलाग करुन अटक केली. एक आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाला. भा.द.वि.१८६० कलम ३९४,३४१,३२३,५०४,३४ व आर्म अॅक्ट ३/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment