नेवासा - ट्रक चालकास मारहाण करून तिघा जणांनी लुटले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, February 21, 2021

नेवासा - ट्रक चालकास मारहाण करून तिघा जणांनी लुटले. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
नेवासा तालुक्यातील उस्थळ दुमाला शिवारात अहमदनगर - औरंगाबाद महामार्गाने ट्रक औरंगाबाद कडे जात असताना ट्रकचालकास लुटण्याची घटना काल शनिवार २० रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास घडली.
याबाबत ट्रकचालक शहाबुद्दीन गुलामवारीस मोहम्मद, वय २१, गौरीगंज, यूपी यांनी नेवासा पाेलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. शहाबुद्दीन मोहम्मद हे शुक्रवार दि.१९ रोजी दुपारच्या दरम्यान मुंबई येथून ट्रकमध्ये फळे घेऊन रांची झारखंड येथे जात असताना 
उस्थळ दुमाला शिवारात एस्सार पेट्रोलपंपा जवळ एका दुचाकीवर आल्या तिघांनी ट्रकला दुचाकी आडवी लावली. त्यामुळे चालकाने ट्रक थांबविली. दुचाकीवरील तिघांनी खाली उतरून ट्रकच्या काचेवर दगड मारले. ट्रकच्या कॅबीनमध्ये चढून ट्रक चालकाला मारहाण केली. खिशातील साडेबारा हजार रुपये काढून घेतले असे फिर्यादीत म्हटले आहे.

नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment