नेवासा - स्व.धनराजशेठ गांधी यांच्या जयंती निमित्ताने शरणपूर वृद्धाश्रमात त्यांना अभिवादन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 10, 2021

नेवासा - स्व.धनराजशेठ गांधी यांच्या जयंती निमित्ताने शरणपूर वृद्धाश्रमात त्यांना अभिवादन. | C24Taas |


नेवासा - शरणपूर येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान्न भोजन देऊन नेवासा येथील दानशूर व्यक्तिमत्त्व स्वर्गीय धनराजशेठ गांधी यांच्या जयंती निमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले.
स्वर्गीय धनराजशेठ हिरालाल गांधी जैन स्ट्रस्ट व हिरालाल जवानमल गांधी जैन स्ट्रस्ट यांच्या संयुक्त 

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवा उद्योजक अभयकुमार गुगळे हे होते तर 
गौरव गुगळे,शरणपूर वृद्धाश्रमचे अध्यक्ष रावसाहेब मगर,वृद्धाश्रम कमिटीचे अध्यक्ष पत्रकार सुधीर चव्हाण,व्यवस्थापक संतोष मगर यावेळी उपस्थित होते.
यावेळी स्वर्गीय धनराज शेठ गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले तर वृद्धाश्रमाला नेहमी हातभार लावणारे नेवासा येथील दानशूर व्यापारी स्वर्गीय अशोकराव गुगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना युवा उद्योजक गौरव गुगळे म्हणाले की दानशूर धनराजशेठ गांधी यांनी नेहमी उपेक्षित घटकांना न्याय देण्याचा जीवनात प्रयत्न केला गोरगरीबांची मुले शिकली पाहिजे म्हणून त्यांनी विद्यालये काढली,अन्नदान व वस्त्रदान शिक्षण संस्थांना उभारी देण्यासाठी देणग्या देऊन त्यांनी उपेक्षित घटकांना शैक्षणिक प्रवाहात आणले धार्मिक क्षेत्रातील त्यांचे कार्य मोलाचे ठरले त्यांचाच वारसा बरोबर घेऊन आम्ही वाटचाल करत राहू अशी ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.
व्यापारी अभय गुगळे म्हणाले की आमचे वडील स्वर्गीय अशोकराव गुगळे यांनी जीवनात धनराजशेठ गांधी यांनी दिलेली शिकवण आचरणात आणली व शेवटच्या श्वासापर्यंत कार्य केले त्यांच्या कार्याचा वसा आम्ही सुरूच ठेऊ वृद्धाश्रमासाठी वेळोवेळी मदत लागल्यास ती करत राहू अशी ग्वाही दिली.
       यावेळी उपस्थित वृद्धांनी भजने गाऊन स्वर्गीय धनराजशेठ गांधी व स्वर्गीय अशोकराव गुगळे यांना श्रद्धांजली वाहिली उपस्थित वृद्धांना यावेळी मिष्टान्न भोजन देण्यात आले.संतोष मगर यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले


नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment