नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी ; मंत्री गडाख यांच्या पाठपुराव्याला यश. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 3, 2021

नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी ; मंत्री गडाख यांच्या पाठपुराव्याला यश. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील रस्त्यांसाठी १०० कोटी रुपयांचा निधी ; मंत्री गडाख यांच्या पाठपुराव्याला यश. | C24Taas |


बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा.  Play Store वर उपलब्ध.

नेवासा तालुक्यातील पाचेगांव ते चिलेखनवाडीसह महत्वाच्या सर्व रस्त्यांसाठी तब्बल शंभर कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे. तालुक्याला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दूरावस्था झाली होती. विधानसभा निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने तालुक्यातील लोकांनी प्रामुख्याने या प्रश्नाकडे तत्कालीन उमेदवार गडाख यांचे लक्ष वेधले होते. मात्र कोरोनामुळे कार्यवाही करण्यात अडचणी निर्माण झाल्या. 

दरम्यान, लॉकडाऊन शिथील होताच नामदार गडाख यांनी तालुक्यातील सर्व महत्वाच्या रस्त्यांच्या कामांचा आराखडा बनविण्याचे आदेश देऊन त्यास प्रशासकीय मंजूरीही मिळविली होती. मात्र प्रत्यक्ष कामास निधी मिळण्यासाठी त्यांना सातत्यपूर्ण मोठा पाठपुरावा करावा लागला.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment