नेवासा - बेलपिंपळगाव येथील ग्रामसभेत पुन्हा एकदा ग्रामसेवक बदलण्याची मागणी. | C 24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, February 21, 2021

नेवासा - बेलपिंपळगाव येथील ग्रामसभेत पुन्हा एकदा ग्रामसेवक बदलण्याची मागणी. | C 24Taas |

बेलपिंपळगाव ग्रामपंचायत चा एक मुखी निर्णय गावातील सर्वाना पिण्याच्या पाण्याची मोफत सेवा दिली जाईल.

नेवासा तालुक्यातील बेलपिंपळगाव येथे शनिवारी सकाळी विशेष ग्रामसभा ही आयोजित करण्यात आली होती यावेळी या सभेला अध्यक्ष म्हणून सरपंच सौ निकिता गटकळ होत्या.

यावेळी नागरिकांनी दोन दिवस आधी पासून आपले आपले काम ,तक्रार असे अर्ज सादर केले होते त्यांचे वाचन करून त्यावर निर्णय घेण्यात आले यावेळी ग्रामपंचायत मार्फत पिण्याच्या पाण्यासाठी चांगला निर्णय घेण्यात आला की या पुढे 1 मार्च पासून गावातील सर्वाना आरो फिल्टर चे मोफत पाणी मिळणार तसेच गावातील सर्व असणाऱ्या वेड्या बाभळी काढून गावात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असून गावाचा चेहरामोहरा बदलला जाईल,

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.

ग्रामस्थ यांनी मागील काळात झालेले काही ठराव रद्द करण्यात येणार असल्याचे आज नवीन ठराव मंजूर केले मागील काही काळ गावातील ग्रामपंचायत मालकीची नेवासा श्रीरामपूर रोडवरील एक एकर जमीन चा परस्पर ठराव करून 99 वर्ष चा करार केला होता त्याला गावातून विरोध झाल्याने तो जुना ठराव रद्द करण्यात आला तसेच यांच्यात दोषी असणाऱ्या वर रीतसर तक्रार करण्यात येणार आहे तसेच गावात कोणाला परमिट रुम साठी परवानगी देण्यात येणार नाही असा देखील ठराव मंजूर करण्यात आला गावात चुकीचे काम हे ग्रामसेवक करत असून त्यांच्या बदली करण्यात यावी अशी एक मुखी मागणी करण्यात आली व तसा ठराव मांडला आहे.

आजच्या ग्रामसभेत ग्रामसेवक आजारी रजा वर गेले असल्याने पंचायत समिती कडून  त्या जागेवर ग्रामविकास अधिकारी उदय मिसाळ हे पर्यायी उपस्थित करण्यात आले होते त्यांनी सगळे काम काज बघितले आज गावातील तंटामुक्ती अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची नव्याने निवड करण्यात आली यावेळी गावातील सामजिक कार्यकर्ते सुखदेव कदम यांनी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली तसेच उपाध्यक्ष म्हणून सोसायटी माजी अध्यक्ष भीमजी साठे यांची निवड करण्यात आली.
या ग्रामसभा साठी उप सरपंच बंडू चौगुले ,सामजिक कार्यकर्ते चंद्रशेखर गटकळ ,प्रा रमेश सरोदे ,कृष्णा शिंदे,किशोर गारुळे ,गणेश कोकणे ,सुनीता कांगुणे,मंदा सरोदे ,ताराबाई भांड ,राजेंद्र साठे,बाळासाहेब तऱ्हाळ ,वसंत कांगुणे, योगेश शिंदे, पोलीस पाटील संजय साठे,तलाठी सोपान गायकवाड, कृषी अधिकारी गायके,पाट बंधारे विभागाचे बाळासाहेब जपे,बी डी शिंदे, प्रा कार्लस साठे,वसंत भद्रे ,किरण साठे,माजी चेअरमन अशोक शिंदे,विध्यमान सोसायटी चेअरमन राजेंद्र गायकवाड, नाना शिंदे,प्रा किशोर गटकळ ,भागवत चौगुले, अमोल कोकणे,मुमताज सय्यद ,रफिक सय्यद ,बंटी शिंदे,प्रशांत साळुंके ,दत्तात्रय राऊत ,एकनाथ भगत ,संजय शिंदे,बाळासाहेब सरोदे,रंभाजी कांगुणे,आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सूत्रसंचालन चंद्रशेखर गटकळ यांनी केले तर आभार राजेंद्र साठे यांनी व्यक्त केले


नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment