नेवासा येथे माऊलींच्या पैस खांबाचे हजारो भाविकांनी घेतले दर्शन.
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.श्रीक्षेत्र नेवासा येथील संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिरातील माऊलींच्या पैस खांबास आज पौष वद्य एकादशीनिमित्त वेदमंत्राच्या जयघोषात अभिषेक घालण्यात आला. सकाळपासून हजारो भाविकांनी माऊलींचे दर्शन घेतले.
पौष वद्य एकादशीनिमित्ताने पहाटे ४ वाजता माऊलींचे मूर्तिमंत रूप असलेल्या पैस खांबास मंदिराचे प्रमुख मार्गदर्शक हभप शिवाजी महाराज देशमुख यांच्या उपस्थितीत अभिषेक घालण्यात आला. देवटाकळी येथील वारकरी संप्रदायातील सेवेकरी कृष्णाभाऊ खरड व सौ. शांताबाई खरड यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment