राहुरी प्रतिनिधी,
माझ्या शेतातील रस्त्याने जायचे यायचे नाही. असे म्हणून नामदेव गि-हे यांना लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना राहुरी तालुक्यातील शेरी चिखलठाण येथे दिनांक २ फेब्रुवारी रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत अशोक केदार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
दिनांक २ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेसात वाजे दरम्यान आरोपी अशोक रामा केदार राहणार राजबेट, शेरी चिखलठाण. हा नामदेव पंढरीनाथ गि-हे यांच्या घरासमोर आला आणि म्हणाला की, तू माझ्या शेतातील रस्त्याने जायचे यायचे नाही. असे म्हणून नामदेव गि-हे यांची गचांडी पकडून त्याचे दोन्ही पायावर तसेच पाठीवर लाकडी दांडक्याने मारहाण केली. नामदेव गि-हे यांच्या फिर्यादीवरुन अशोक केदार याच्या विरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार साईनाथ टेमकर हे करीत आहेत.
No comments:
Post a Comment