सोनईतील उबेद शेखला मुंबई आर्ट सोसायटी चित्र प्रदर्शनात सुवर्ण पदक.
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.सोनई(वार्ताहर)कला आकार फाऊंडेशन (नवीदिल्ली)
आयोजित चित्र प्रदर्शनात सोनई येथील उबेद सलीम शेख यांच्या चित्राची कलाकृती उत्कृष्ट ठरली आहे. यानिमित्त त्यांचा सुवर्ण पदक देवून सन्मान करण्यात आला आहे.

सोनई येथील शनिश्वर विद्या मंदीरचे माजी प्राचार्य सलीम शेख यांचा उबेद शेख हा मुलगा असुन त्याने बारावीपर्यंतचे शिक्षण सोनईत केले.पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात त्याने 'बीएफए' ही पदवी घेतली.त्यास कला शिक्षिका अर्पिता कोल्हटकर यांचे मार्गदर्शन लाभले.
मुंबई आर्ट सोसायटी येथे भरलेल्या चित्र प्रदर्शनात
शेख यांचे चोवीच चित्र ठेवण्यात आले होते. पैकी
बंजारा समाज जीवनावर आधारित चित्र उत्कृष्ट ठरले.
कला आकार संस्थेच्या संचालिका जया अरोरा यांच्या हस्ते शेख यांचा सुवर्ण पदक देवून सन्मान करण्यात आला. या निवडीबद्दल त्याचे परीसरातून अभिनंदन होत आहे.
No comments:
Post a Comment