- C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 3, 2021

 राहुरी प्रतिनिधी, 

राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची घटना दिनांक १ फेब्रुवारी रोजी घडली असून याबाबत पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


        याबाबत अधिक माहिती अशी कि, अपहरण झालेली मुलगी हीचे वय १७ वर्षे ५ महिने इतके आहे. ती राहुरी तालुक्यातील गुंजाळे येथे आपल्या घरच्या लोकांबरोबर राहते. दिनांक १ फेब्रुवारी रोजी रात्री १२.३० ते पहाटे ४.३० वाजे दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने त्या मुलीला अज्ञात कारणासाठी फुस लावून पळवून नेले. मुलीच्या वडिलांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात इसमा विरुध्द गुन्हा रजि. नं. व कलम 1902/२०२१ भादवि कलम ३६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुशांत दिवटे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment