उल्हासनगर - अंबरनाथ येथे उभारण्यात येणार मेडिकल महाविद्यालय..आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश.... - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 3, 2021

उल्हासनगर - अंबरनाथ येथे उभारण्यात येणार मेडिकल महाविद्यालय..आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश....

अंबरनाथ येथे उभारण्यात येणार मेडिकल महाविद्यालय..आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या पाठपुराव्याला यश....ANC..अंबरनाथ शहरात भव्य असे मेडीकल महाविद्यालय उभारण्यासाठी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमीत देशमुख यांनी हीरवा कंदील दिला आहे.अंबरनाथ चे आमदार डॉ.बालाजी कीणीकर यांनी कीत्येक महीण्यापासुन सुरु केलेल्या प्रयत्नांना काल अखेर यश आले आहे.VO..अंबरनाथ पूर्व भागातील सर्वे नं.166 येथील तब्बल 26 एकर शासकीय जागेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरिता पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अंबरनाथ चे आमदार डॉ.बालाजी किणीकर हे गेल्या अनेक महीण्यापासुन शासन स्तरावर पाठपुरावा करत होते.त्याअनुषंगाने काल वैद्यकीय शिक्षण मंत्री ना.अमित देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अंबरनाथ येथे वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास देशमुख यांनी हिरवा कंदील दिला असून प्रस्ताव तयार करण्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाला निर्देश देखील दिले आहेत.या बैठकीला नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी,वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय,सह संचालक डॉ. चंदनवाले,सहसचिव संजय बानाईत,उपसचिव

कैलाश बधान,उल्हासनगर प्रांत अधिकारी जयराज कारभारी,आदी उपस्थित होते.

 

No comments:

Post a Comment