कुकाणा ग्रामपंचायत सरपंच पदी सौ.लताबाई अभंग तर उपसरपंचपदी सौ.शुभांगी कचरे यांची निवड.
बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.नेवासा तालुक्यातील कुकणा ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच पदाची निवड मतदान घेऊन निवड करण्यात आली.
यामध्ये छायाताई गोर्डे यांना ६ तर लताबाई विठ्ठल अभंग यांना ९ मते मिळाल्याने सरपंचपदी निवड झाली तर इक्बाल इनामदार यांना ६ तर शुभांगी सोमनाथ कचरे यांना ९ मते मिळाल्याने उपसरपंचपदी निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी यांनी जाहीर केले. निवडणूक अधिकारी दिगंबर भांड व ग्रामविकास अधिकारी सुभाष गर्जे यांनी निवडणूक काम केले.
ग्रामविकास मंडळाचे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच उपसरपंच यांचा ग्रामस्थांच्या हस्ते सत्कार केला .यावेळी ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्तीत होते.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment