राहुरी - माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी प्रिती ढोकचौळे या विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, February 3, 2021

राहुरी - माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी प्रिती ढोकचौळे या विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना

 राहुरी प्रतिनिधी, 

बांधकाम करण्यासाठी माहेरहून दोन लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी प्रिती ढोकचौळे या विवाहितेचा शारीरीक व मानसिक छळ केल्याची घटना २५ फेब्रुवारी २०२० ते १४ सप्टेंबर २०२० दरम्यान घडली आहे. याबाबत सासरच्या सहा लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


       सौ. प्रिती सुभाष ढोकचौळे वय २४ वर्षे, धंदा घरकाम राहणार खंडाळा ता. श्रीरामपुर. जिल्हा अहमदनगर हल्ली राहणार तांदुळनेर, ता. राहुरी. या विवाहितेने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, २५ फेब्रुवारी २०२० मध्ये लग्न झाल्यानंतर काही दिवस सासरच्या लोकांनी चांगले नांदवीले. मात्र त्यानंतर यातील आरोपी यांनी सौ. प्रिती ढोकचौळे या विवाहितेला 

माहेरहुन बांधकाम करण्यासाठी दोन लाख रुपये आणावे. या मागणीकरीता तीला वेळोवेळी लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन शिवीगाळ केली. तसेच उपाशीपोटी ठेवून तीचा शारिरीक व मानसिक छळ केला. या सर्व त्रासाला कंटाळून सौ. प्रिती ढोकचौळे या विवाहितेने राहुरी पोलिसांत धाव घेऊन घडलेला प्रकार सांगितला. तिच्या फिर्यादीवरुन १) सासरा- हरिभाउ महादु ढोकचौळे २) सासु- सुशिला हरिभाउ ढोकचौळे ३) दिर- दत्तु हरिभाउ ढोकचौळे ४) नवरा-  सुभाष हरिभाउ ढोकचौळे ५) आजीसासु- जिजाबाई महादु ढोकचौळे सर्व राहणार खंडाळा ता. श्रीरामपूर. तसेच ६) नणंद- सुवर्णा योगेश गाढवे. राहणार गणेशनगर ता. राहाता. या सहाजणांवर गुन्हा रजि. नं. १०१/२०२१ भादवि  ४९८ अ, ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो. हे. काँ. डि के आव्हाड हे करीत आहे.

No comments:

Post a Comment