नेवासा तालुक्यातील 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंचाची 9 फेब्रुवारीला निवड. | C24Taas |
नेवासा तालुक्यातील निवडणुका झालेल्या 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच पदाची निवडणूक 9 फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी दिली.

त्याकरिता नेवासा तहसिलदार यांनी 59 ग्रामपंचायतीच्या सरपंच-उपसरपंच निवडीसाठी अध्यासी अधिकाऱ्यांची नेमणूक जाहीर केली आहे . नियुक्त केलेले अध्यासी अधिकारी यांनी सरपंच-उपसरपंच निवडीची विशेष सभा संबंधित ग्रामपंचायत कार्यालयामध्ये दि. 09 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 2 वाजता आयोजित करावी व सदर सभेची नोटीस प्रत्येक सदस्यांना अशा सभेच्या तीन पुर्ण दिवस आगोदर देण्याची व्यवस्था करावी. नेमणूक केलेले अध्यासी अधिकारी यांची तहसिल कार्यालय नेवासा येथे आज दि. 04 फेब्रुवारी 2021 रोजी दुपारी 4 वाजता बैठक घेण्यात आली.
No comments:
Post a Comment