नेवासा - सोशलमीडियावर फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाकडून तलवार जप्त.! | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, February 11, 2021

नेवासा - सोशलमीडियावर फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाकडून तलवार जप्त.! | C24Taas |

सोशलमीडियावर फोटो व्हायरल करणाऱ्या युवकाकडून तलवार जप्त.!

बातम्या पाहण्यासाठी C24Taas ॲप डाऊनलोड करा. Play Store वर उपलब्ध.
नेवासा - सोशल मीडियावर तलवारीसह फोटो व्हायरल करणाऱ्या नेवासा तालुक्यातील कुकाणा येथील युवकाकडून नेवासा पोलिसांनी तलवार जप्त केली असून त्याच्यावर आर्म अॅक्टनुसार कारवाई केली. 
याबाबत पोलीस नाईक राहुल बबन यादव यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, सकाळी पावणेदहाच्या सुमारास कुकाणा येथे राजेंद्र साळुके याच्या घरासमोर जाऊन त्याला पोलीस उपनिरीक्षक भरत दाते यांनी व्हायरल फोटो दाखवून विचारपूस केली. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर खोलवर 
विचारपूस केली असता त्याने त्याच्या घरात तलवार असल्याचे मान्य केले. घराच्या पत्र्याला खोचून ठेवलेली तलवार काढून दिली. त्याच्याकडून ७१ सेंटीमीटर लांबीची तीन हजार रुपये किंमतीची लोखंडी गंज चढलेली तलवार त्यात सिल्व्हर नक्षीची मुठ १६ सेंटीमीटर असलेली व पाते ५५ सेंटीमीटर पुढे टोकदार निमुळती असलेली तलवार मिळाली. राजेंद्र ज्ञानेश्वर साळुके याच्यावर बेकायदेशीर तलवार ताब्यात बाळगल्याने गुन्हा रजिस्टर सेकंड ७८/२०२१ आर्म अॅक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment