नेवासा - कार व दुचाकीच्या अपघातात फोटोग्राफर परमेश्वरचे निधन. | C24Taas |
बीड जिल्ह्यातील केज तालुक्यात मसाजोग गावाजवळ केज-बीड रोडवर कार आणि दुचाकीची समोरा- समोर झालेल्या धडकेत दुचाकीने पेट घेतल्याने दुचाकी आगीत जळून खाक झाली तर दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना रविवार १० जानेवारी रोजी घडली.
अपघातात मृत्यूपावलेल्या परमेश्वर नरवटे हा केज तालुक्यातील इस्थळ येथील रहिवासी असून तो गेल्या १० ते १५ वर्षापासून फोटोग्राफी व्यवसाय निमित्ताने नेवासा येथे वास्तव्यास होता. तर परमेश्वर याचे १५ दिवसांपूर्वी विवाह झाला होता आणि आज त्याच्यावर काळाने घाला घातल्याने नेवासा तालुक्यात सह केज तालुक्यातील इस्थळ गावावर शोककळा पसरली आहे.
केज पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी आहे की रविवारी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कार एमएच-२३ वाय-०१२१ व दुचाकीस्वाराची समोरासमोर जोराची धडक झाल्याने हा अपघात झाला. धडक होताच दुचाकीने पेट घेतला. यात दुचाकी अक्षरशः आगीत जळून खाक झाली. यात दुचाकीस्वार परमेश्वर नरोटे याचा दुर्देवी मृत्यू झाल्याचे केज पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल लोखंडे यांनी सांगितले.
परमेश्वर नरवटे रा. इस्थळ ता. केज जि. बीड, ह.मु. नेवास येथे परमेश्वरचा नेवासा बस स्टॅन्ड जवळ फ्लॅश फोटो स्टुडिओ हा व्यवसाय आहे. त्याच्या मृत्यूच्या बातमीने इस्थळ गावासह नेवासा तालुक्यातील मित्र परिवाराच्या डोळ्यात अश्रू.
So sad News
ReplyDelete