नेवास - ग्रा.पं.निवडणुकीत उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर ; डाटा बॅलन्स वाया जातो ,मतदार हैरान. | c24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 13, 2021

नेवास - ग्रा.पं.निवडणुकीत उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर ; डाटा बॅलन्स वाया जातो ,मतदार हैरान. | c24Taas |

नेवास - ग्रा.पं.निवडणुकीत उमेदवारांकडून सोशल मीडियाचा वापर ; डाटा बॅलन्स वाया जातो ,मतदार हैरान. | c24Taas |

नेवासा तालुक्यातील ५२ गावच्या संसदेची सत्ता काबिज करण्यासाठी ग्रामीण भागात सोशल मीडिया वॉर जोरात असून प्रचारात रंगत येत असली तरी गावोगाव त्यामुळे कुरबुरी,भांडणे देखील वाढत आहेत व यात उमेदवारांचा महत्वाचा वेळ जात आहे.

 तालुक्यातील ५९ ग्रामपंचायती मध्ये निवडणूक बिनविरोध करण्याचे ५२ गावाच्या गावपुढार्‍यांचे मनसुबे फोल ठरल्याने आखडे चांगलेच रंगू लागले  शेवटच्या दोन दिवसात त्याच्या पारंपरिक  ताई माई आक्का बरोबर आहे  प्रत्येक मतदाराला गाठण्याचा प्रयत्न होत असताना मतदारांवर सोशल मीडियाद्वारे भडीमार करतानाही दिसत आहे.

 मागील निवडणुकांमध्ये मेसेजेस जास्त होते यावेळी मात्र उमेदवारांनी आपले व्हिडिओ तयार करुन घेतले आहेत या व्हिडिओ द माध्यमातून मतदारांच्या मोबाईल द्वारे हृदयात घुसून आपले मत मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत व्हिडिओमधील गमती जमती मुळे व्हिडिओला अनेक लाईक कॉमेंट वर्षाव होतो पण वाईट कॉमेंट मुळे वादावादी देखील सुरुवात झाली आहे.

दरम्यान अनेक ठिकाणी मतदारांना  मध्ये भावकीच्या भावनिक नाट्याचाही कहर पाहण्यास मिळणार असल्याने मतदारांचे चांगलेच मनोरंजन होणार हे मात्र नक्की  . गटातटाबरोबरच भावकीच्या राजकारणालाही चांगलाच रंग चढला आहे अनेक नातेवाईक त्यांच्याविरोधात उभे आहेत. गावपुढार्‍यांना आम्हीच कसे किंगमेकर आहोत हे दाखवण्याची घाई झाली आहे. काही जागेसाठी अपक्ष निवडणूक आखाड्यात उभे ठाकले आहे . त्यामुळे राजकिय वातावरण संवेदनशिल  झाले आहे.

काही उमेदवार नात्यागोत्याच्या मैत्रीसंबाधाच्या  आपले नशिब आजमू पाहत आहेत . तर जुन्या राजकारणाला उजाळा देत मागचा वचपा काढण्यासाठी समोर न येता आतून सहकार्य करत राजकारणातही खान्याचे आणी दाखवण्याचे दात कसे असतात . हे  अनेक ठिकाणी दिसून येणार आहे त्यामुळे सोशल मीडिया वरून भांडणे लावण्याचे उद्योगहोत आहेत


यावर्षी निवडणुकीत व्हाट्सअप, फेसबुक इंस्टाग्राम, यूट्यूब, लाईव्ह व्हिडिओ याचा वापर होत असल्याने आमचा अनेक एम बी डाटा वाया जात आहे -  मतदार


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment