नेवासा - नृत्य दिग्दर्शक संदिप नर्के हे "बेस्ट टीचर अवॉर्ड २०२०" पुरस्काराने सन्मानित. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 9, 2021

नेवासा - नृत्य दिग्दर्शक संदिप नर्के हे "बेस्ट टीचर अवॉर्ड २०२०" पुरस्काराने सन्मानित. | C24Taas |

नेवासा - नृत्य दिग्दर्शक संदिप नर्के हे "बेस्ट टीचर अवॉर्ड २०२०" पुरस्काराने सन्मानित.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

 नेवासा - नृत्य क्षेत्रातील एक सुप्रसिद्ध नाव संदिप नर्के गेली २७ वर्षांपासून जास्त काळ झाला ते डान्स कोरिओग्राफर म्हणून कार्यरत आहेत. संदिप नर्के यांना याआधी देखील ४ ऑल इंडिया बेस्ट डान्सर अवॉर्ड देखील मिळाले आहेत संदिप नर्के यांना सिंगापूर मध्ये देखील एक इंटरनॅशनल अवॉर्ड मिळाला आहे.सध्या पुण्यातील संदिप नर्के हे यश अकॅडमी सोनई या शाळेत गेली ७ वर्षांपासून डान्स टीचर म्हणून कार्यरत आहे. संदिप नर्के यांनी शाळेच्या मुलांना देखील सिंगापूर येथे इंटरनॅशनल अवॉर्ड मिळून दिला आहे. आता नुकताच संदिप नर्के यांना इन्स्टिट्यूट ऑफ स्कॉलर्स तर्फे "बेस्ट टीचर अवॉर्ड २०२०" या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

 सर्वश्रेष्ठ शिक्षक पुरस्कार शिक्षण क्षेत्रात उत्कृष्टता आणि उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकाला प्रदान करण्यात येतो त्यासाठी संस्था आधी त्या शिक्षकाची गुणवत्ता, पात्रता आणि योग्यता या गोष्टींची कसून परीक्षण करते आणि सर्व बाबतीत उत्कृष्ट कामगिरी असणाऱ्या शिक्षकासच हा सन्मान प्रदान करण्यात येतो शिक्षकांसाठी त्यांची प्रतिष्ठा वाढविण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येतो प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत त्यांच्या प्रामाणिक आणि उत्कृष्ट उल्लेखनीय कार्यासाठी त्यांची 

 प्रतिष्ठा आणि त्यांच्यात एक नवी ऊर्जा आणि चैतन्य निर्माण करण्यासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात येते सध्या कोरोना काळात सर्व शाळा बंद असल्यामुळे सर्व शिक्षक त्यांचे कौशल्य ऑनलाइन पद्धतीनेच सर्व विद्यार्थ्यांना देत आहेत आणि त्यातून ही सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आपले कौशल्य शिक्षक कला शिक्षक जेणेकरून लॉकडाऊन च्या काळात मुलांना त्यांच्या शारीरिक आणि बौद्धिक विकासासाठी योग्य मार्गदर्शन करतात आणि त्यात नृत्य शिक्षक म्हटलं की मग तर मुलांची बल्ले बल्लेच हसतखेळत मुलांच्या शारीरिक प्रगतीसाठी 

एक नृत्य शिक्षक त्यांच्या आवडीनुसार आणि मुलांच्या आवडीच्या गाण्यांवर नृत्याच्या वेगवेगळ्या प्रकारांनी त्यांना मंत्रमुग्ध करत त्यांना योग्य ते त्यांच्या प्रकृतीला आणि बौद्धिक चालनेला चालना देणारे प्रकार घेत असतात उदाहरणार्थ काही झुंबा डान्स प्रकार काही देशभक्तीपर नृत्य प्रकार काही सांस्कृतिक म्हणजे सणावारा प्रमाणे काही नृत्य प्रकार जसे की होळी, दिवाळी, रक्षाबंधन, भाऊबीज 

नाताळ इत्यादी अशा प्रकारांत मुलांचे नृत्य प्रकारही शिकून होतात आणि त्यामुळे त्यांच्या शरीराचा व्यायामही उत्कृष्ट प्रकारे होतो अशा या कौशल्य कला शिक्षकास यावर्षीचा सर्वश्रेष्ठ शिक्षक पुरस्काराने श्री संदिप नर्के यांना या वर्षीचा सन्मान प्राप्त झाला आहे सध्या कोरोना काळात सर्वांनी जबाबदारी आणि खबरदारी चा उपाय म्हणून या वर्षीचा पुरस्कार वितरण सोहळा ऑनलाइन पद्धतीनेच पार पडला आणि जे पुरस्कार मानकरी आहेत यांचे पुरस्कार साहित्य त्यांना पोस्टाने घरपोच करण्यात आले.

No comments:

Post a Comment