नेवासा येथे साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्न,समाज रत्न, साई रत्न पुरस्काराचे वितरण. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 29, 2021

नेवासा येथे साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्न,समाज रत्न, साई रत्न पुरस्काराचे वितरण. | C24Taas |

नेवासा येथे साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्न,समाज रत्न, साई रत्न पुरस्काराचे वितरण. | C24Taas |

नेवासा - साईशिवार प्रतिष्ठानच्या वतीने पत्रकार रत्न,समाज रत्न,साई रत्न,पुरस्कार वितरण कार्यक्रमाला गुरुवारी दि.२८ जानेवारी रोजी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.साईबाबांचे नेवासा शिवारात झालेल्या कार्याच्या प्रचार व प्रसार करण्यासाठी स्थापन झालेल्या साई शिवार प्रतिष्ठानच्या कार्याला गती देण्यासाठी पाठबळ देऊ अशी ग्वाही नेवासा नगरपंचायतचे मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना दिली.

नेवासा येथील जुन्या पेठेतील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी उपस्थित जेष्ठ पत्रकार, नगरसेवक,व्यापारी,मान्यवर यांचे स्वागत केले.प्रतिष्ठानचे सल्लागार पत्रकार सुधीर चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.यावेळी गुरुवर्य भास्करगिरी महाराज यांनी व्हिडिओ कॉलद्वारे कार्यक्रम स्थळी शुभेच्छा दिल्या.व साई शिवार प्रतिष्ठानचे हे कार्य उत्कर्षाकडे जाईल असा शुभाशीर्वाद दिला.

    यावेळी साईसेवेकरी म्हाळसापती यांचे वंशज असलेल्या त्यांच्या पणती श्रीमती गंगुबाई सीताराम डहाळे व पत्रकार अशोक डहाळे,साई सेवेकरी बाळाजी पाटील यांचे वंशज अंबादास जायगुडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले यावेळी  या सर्वांचा साई रत्न उपाधी सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.तर नेवासा तालुक्याच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या जेष्ठ पत्रकारांचा यावेळी साईचरित्रकार गोविंद दाभोळकर यांच्या नावाने "पत्रकार रत्न"उपाधी  देऊन यावेळी गौरविण्यात आले.यामध्ये जेष्ठ पत्रकार रामभाऊ पठाडे,मधुकरराव देशपांडे,सोपानराव दरंदले,बाळासाहेब तनपुरे,भाऊसाहेब पाठक,विजय भंडारी,नीलकंठ चौरे, शिवाजीराव पालवे,अशोक डहाळे, विजय गांधी,बन्सी भाऊ एडके यांचा समावेश होता.

   नेवासा शहरासाठी योगदान दिल्याबद्दल नगराध्यक्ष सौ.योगिता सतीश पिंपळे,उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव जगताप,माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक यांना समाजरत्न उपाधी देऊन सन्मानित करण्यात आले.नगरसेविका सौ.शालीनीताई संजय सुखदान,इंजिनीयर सुनील वाघ,भाजप गटनेते नगरसेवक सचिन नागपुरे,सौ.अनिता भारत डोकडे,सौ. अर्चना कु-हे,फारुखभाई आतार,सचिन वडागळे,अंबिका अंबादास ईरले,श्रीमती फिरोजबी पठाण,असिफभाई पठाण,संदीप बेहळे,नगरसेविका सौ.सीमा राजेंद्र मापारी, डॉ.निर्मला सांगळे, दिनेश व्यवहारे,रणजित सोनवणे,माजी नगराध्यक्षा संगिता बर्डे यांचा या पुरस्कारात समावेश होता.

   या सर्व मान्यवरांना साई भंडारा उपक्रमाचे पहिले अन्नदाते जयकुमार गुगळे,अभयकुमार गुगळे,सूर्यकांत गांधी साई शिवारचे मार्गदर्शक दिलीपराव चुत्तर,विश्वस्त लक्ष्मीकांत डहाळे, सचिन कडू,शरद पंडुरे, नितीन कुंढारे,संभाजी पवार, शिवाजी काकडे, दत्तात्रय जायगुडे, उमेश पंडुरे,ज्ञानेश्वर पंडुरे,रामेश्वर जाधव, महेश पंडुरे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.यावेळी यश पडूंरे व आदेश डहाळे या बालकांनी बालफकीराची वेशभूषा परिधान करून उपस्थित साई भक्तांमध्ये भिक्षा झोळी मागितली.यावेळी झालेल्या कार्यक्रम प्रसंगी प्रगतशील शेतकरी संभाजीराव कार्ले,संत ज्ञानेश्वर महाराज मंदीर देवस्थानचे विश्वस्त रामभाऊ जगताप,देविदास साळुंके,संभाजी माळवदे,जेष्ठ व्यापारी विनायकराव पोतदार,कृषी तज्ञ डॉ.अशोकराव ढगे,दिलीप चंगेडीया,सतीश चुत्तर,सुरेश चुत्तर,आण्णाभाऊ पेचे यांच्यासह व्यापारी,पत्रकार, नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आदर्श शिक्षक पुरस्कार विजेते डॉ.रेवणनाथ पवार यांनी सूत्रसंचालन केले तर साई शिवार प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीकांत डहाळे यांनी आभार मानले.


साईबाबांचे नेवासा शिवारात झालेल्या कार्याचा प्रचार व प्रसार होण्यासाठी स्थापन झालेल्या साई शिवार प्रतिष्ठानच्या कार्याला गती देण्यासाठी पाठबळ देऊ अशी ग्वाही नेवासा नगरपंचायतचे  मार्गदर्शक व माजी उपनगराध्यक्ष नंदकुमार पाटील यांनी यावेळी बोलताना दिली. 


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment