नेवासा शहरात भरदिवसा घरफोडी ; २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 8, 2021

नेवासा शहरात भरदिवसा घरफोडी ; २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास. | C24Taas |

नेवासा शहरात भरदिवसा घरफोडी ; २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज लंपास. | C24Taas |

 नेवासा शहरातील राहत्या घरातून भरदिवसा रोख रक्कम व सोन्याचे दागिने चोरीस गेल्याची घटना घडली असून याबाबत दाखल फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा 

 दाखल करण्यात आला आहे. याबाबत अनिता संतोष बनसोडे.वय ४१, धंदा शिक्षिका नेवासा खुर्द यांनी फिर्याद दिली असून त्यात म्हटले की, ७ जानेवारी रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या दरम्यान नेवासा खुर्द 

   येथील राहत्या घराचा कडी कोयंडा तोडून आत प्रवेश करून अज्ञात चोरट्यांनी रोख रक्कम व जुने वापरते. दागिने असा सोन्याचे दागिने २३ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेला. 

या फिर्यादीवरून नेवासा पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम ३८०, ४५४ प्रमाणे घरफोडीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास हवालदार तुळशीराम गिते करत आहेत.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment