नेवासा - जयवंत मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने गौरवण्यात आले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 29, 2021

नेवासा - जयवंत मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने गौरवण्यात आले. | C24Taas |

नेवासा - जयवंत मोटे यांना कोरोना योद्धा पुरस्कार देऊन जन आधार सामाजिक संघटनेच्यावतीने गौरवण्यात आले.

नेवासा - समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी आणि समाजातील अनेक समस्या सोडविण्यासाठी जन आधार सामाजिक संघटना प्रयत्न करत आहे. आणि ह्या संघटने चे ध्येय आणि उद्दिष्ट एकच आहे की सर्व समाजातील तळागाळातील लोकांना एकत्र करून संघटना मजबूत करून सर्व सामान्याचे ज्वलंत प्रश्न प्रशासना समोर मांडुण ते सोडविण्याचे काम  जनआधार सामाजिक संघटना करत असल्याचे संस्थापक अध्यक्ष प्रकाशजी पोटे यांनी सांगितले. 

  ते नेवासा तालुक्यातील घोडेगाव येथे पुरस्कार वितरण सोहळा तसेच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.कामासारखा गुरू नाही.जेथे अन्याय होत असेल तेथे लढा देणे हे संघटनेचे मुख्य ध्येय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी वडाळा बहिरोबा येथिल सामाजिक कार्यकर्ते जयवंत मोटे यांना विशेष कार्याबद्दल मान्यवरांच्या हस्ते कोरोना योद्धा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

   यावेळी संघटनेचे सचिव अमित गांधी,ह.भ.प.कृष्णाजी महाराज नागे, संघटनेच्या महिला जिल्हा अध्यक्ष माया शेंडे,शिंगवे तुकाई चे सतिश थोरात,राजु लांडे,अरूण कापसे,रागिनी कांकरीया,तालुका महिला अध्यक्ष मंगल भाकरे,कावेरीताई शिंदे, यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी तालुका अध्यक्ष अजित वांढेकर,तालुका सचिव बंडू दहातोंडे,संतोष टेमक,नसीब पठाण,अजय शिंदे,अतिश ढाले,भिमराज महाले,सोमनाथ कचरे,केशव कानडे,काका नरवणे,आदीनाथ बर्वे,शहाजी धुमाळ,सरपंच सोमनाथ कदम,लक्ष्मण कर्डिले,माधुरी जामदार,सुषमा थोरात,सुवर्णा जावळे,नंदाताई उगले,शालीनीताई लांडे,कोमल मोरे आदीसह नेवासा तालुक्यातील जन आधार संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment