नायलाॅन मांजाची विक्री : राहुरी शहरातील तीन व्यापार्‍यावर गुन्हा दाखल. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, January 5, 2021

नायलाॅन मांजाची विक्री : राहुरी शहरातील तीन व्यापार्‍यावर गुन्हा दाखल. | C24Taas |

नायलाॅन मांजाची विक्री : राहुरी शहरातील तीन व्यापार्‍यावर गुन्हा दाखल. | C24Taas |

राहुरी ( प्रतिनिधी,मनोज साळवे. ) - नायलाॅन मांजामुळे जिवीत हानी होऊ शकते. हे माहीत असताना देखील नायलाॅन मांजाची विक्री करणाऱ्या राहुरी शहरातील काही प्रतिष्ठित व्यापार्‍यांच्या दुकानात पोलिसांनी धाड टाकून कारवाई केली. तसेच नायलाॅन मांजा जप्त करून तिन व्यापार्‍यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

   प्लास्टिक किंवा पक्क्या धाग्यापासून बनवलेल्या नायलॉन मांजाच्या विक्रीमुळे पक्षांना, प्राण्यांना व मानवी जीविताचे तीव्र होऊन अपघात होऊन जीवितहानी होऊ शकते. हे माहीत असताना राहुरी शहर हद्दीतील मल्हारवाडी रोड परिसरातील अजिज फिरोज शेख, वय ३६ वर्ष याने त्याच्या न्यु किस्मत किराणा दुकान आणि आझाद चौक येथील अशोक मुळचंद राका, वय ५३ वर्ष याने त्याच्या राका दुकानात तसेच क्रांतिचौक येथील विजय विठ्ठल सिन्नरकर याने त्याच्या हरिओम माऊली दुकानात नायलाॅन मांजाची विक्री सुरू ठेवली होती. अजिज शेख, अशोक राका व विजय सिन्नरकर या तिनही व्यापार्‍यांनी महाराष्ट्र शासन नियम क्रमांक सी आर टी 2015 /37 दिनांक 18 जून 2016 रोजी काढलेल्या निर्देशनाची अवज्ञा करून इतरांच्या जीविताची सुरक्षितता धोक्यात आणणारी कृती केली. तसेच नायलॉन मांजाची विक्री करत असताना मिळून आले. 

   या घटनेत अजिज फिरोज शेख, अशोक मुळचंद राका व विजय विठ्ठल सिन्नरकर या तीन व्यापार्‍यावर पोलिस हवालदार दिगंबर मोहन सोनटक्के यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत गुन्हा रजि. नं. व कलम 07/2021 भादंवि कलम 188, 336, सह पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 चे कलम 5 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.No comments:

Post a Comment