नेवासा - रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रशांत गडाख थेट बांधावर, गडाखांच्या शिष्टाईला यश; प्रथमच या रस्त्याच्या कामास आमदार निधीतून सुरूवात. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 23, 2021

नेवासा - रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रशांत गडाख थेट बांधावर, गडाखांच्या शिष्टाईला यश; प्रथमच या रस्त्याच्या कामास आमदार निधीतून सुरूवात. | C24Taas |

नेवासा - रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रशांत गडाख थेट बांधावर, गडाखांच्या शिष्टाईला यश; प्रथमच या रस्त्याच्या कामास आमदार निधीतून सुरूवात. | C24Taas |

भालगाव येथील रस्त्याचा वाद मिटविण्यासाठी प्रशांत गडाख यांनी ग्रामस्थ, शेतकऱ्यांसह शेताच्या बांधावरच बैठक घेतली व रस्ताच्या कामात वाद बाजुला ठेवून एकत्र आलेल्या शेतकऱ्यांचा सत्कार केला.

नेवासा तालुक्यातील भालगाव येथील गुप्ताईदेवी मंदिराकडे जाणारा सुमारे अडीच किलोमीटर अंतराचा रस्ता शेताच्या बांधावरील व व्यक्तिगत वाद यामुळे बंद होता या रस्त्याचे काम मार्गी लागत नसल्याने या परिसरातील पादचारी व वाड्यावस्त्यांवर रहाणारे शेतकरी ही चिंतेत होते मात्र प्रशांत गडाख यांनी शेताच्या बांधावर जाऊन या रस्त्याचा वाद असणाऱ्या दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांमध्ये समेट घालवून हा वाद सोडविला त्यामुळे रस्त्याच्या कामाला प्रारंभ झाल्याने परिसरातील शेतकरी व ग्रामस्थ प्रशांत गडाख यांना धन्यवाद देतांना दिसत आहे.तर वाद सामंजस्याने मिटवणाऱ्या शेतकऱ्यांचा यावेळी प्रशांत गडाख यांनी गौरव करून नवा आदर्श समाजापुढे उभा केला आहे. 

याबाबत माहिती अशी की नामदार शंकरराव गडाख यांनी भालगाव येथील प्रसिद्ध गुप्ताई देवी परिसरातील कायमच दुर्लक्षित असलेल्या  या रस्त्यावर कधी साधा मुरूमही  पडलेला नव्हता अशा दुर्लक्षित अडीच किलोमीटर अंतराच्या रस्त्यासाठी मंत्री  शंकरराव गडाख यांनी प्रशांत गडाखांनी  निवडणूक काळात दिलेल्या रस्ता कामाच्या अश्वासनास पुढाकार घेऊन सुमारे २५ लाखाचा निधी मंजूर करत वचनपूर्ती केली 

   मात्र रस्ता काम सुरू असतांना  बांधावर पाईप टाकण्याच्या वादामुळे या रस्त्याचे काम बंद पडल्याने.भागातील सर्वजण चिंतेत पडले तेव्हा प्रशांत गडाख यांनी तातडीने भालगाव गुप्ताई रस्त्याची पहाणी केली वाद असलेल्या काही शेतकऱ्यांना समोरासमोर आणून त्यांची समजूत काढत  गावकऱ्यांचे हित व एकोपा जोपासण्याचे आवाहन  केले व गावकऱ्यांनीही त्यास प्रतिसाद दिला. त्यांच्यातील दुवा बनून वाद जागेवर मिटवला आणि  रस्त्याच्या रखडलेल्या कामास सुरुवात करण्यात आली.

प्रशांत गडाख यांनी शिष्टाई केल्यामुळे रस्त्यातील वाद कायमचा मिटवून रस्त्याचे काम सुरू झाल्याने उपस्थित शेतकरी व ग्रामस्थ प्रशांत गडाख यांचा सत्कार करू लागले असता, ज्यांच्या सामंजस्याने वाद मिटला तेच खरे या सत्कारास पात्र असल्याचे सांगून प्रशांत गडाख यांनी दोन्हीही बाजूच्या शेतकऱ्यांचा पुष्पहार व शाल घालून गौरव केला. या आदर्शवत कार्याचे उपस्थित शेतकऱ्यांनी टाळ्यांची दाद देत कौतुक केले.


सर्व गावकऱ्यांनी असेच गटतट बाजूला ठेऊन विकासकामात सहकार्य केल्यास गावाची उन्नती होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे मंत्री शंकरराव गडाख यांना देखील काम करण्यास हुरूप येईल. आज जो प्रश्न समझोत्याने सुटला आहे त्याचा आदर्श आपण दत्तक घेतलेल्या बेलपिंपळगाव गटातील इतर गावांनी ही घ्यावा.यामुळे विविध विकास कामे जोमाने करण्यास मंत्री शंकरराव गडाख यांना ऊर्जा येईल.
- प्रशांत गडाख अध्यक्ष, यशवंत सामाजिक प्रतिष्ठान.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment