नेवाशात नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा रस्तारोको ; ४ महिन्याचा थकित पगार मिळावा या मागणीसाठी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 25, 2021

नेवाशात नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा रस्तारोको ; ४ महिन्याचा थकित पगार मिळावा या मागणीसाठी. | C24Taas |

नेवाशात नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा रस्तारोको ; ४ महिन्याचा थकित पगार मिळावा या मागणीसाठी,मुख्याधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनंतर आंदोलन स्थगित.

दिवसरात्र काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठिशी नेवासकरांनी उभे रहाण्याची गरज - संजय सुखदान

नेवासा नगरपंचायत कर्मचाऱ्यांना गेल्या चार ते पाच महिन्याचा पगार मिळालेला नाही आमचे थकीत वेतन मिळावे म्हणून सोमवारी दि.२५ जानेवारी रोजी दुपारी १ वाजता श्रीरामपूर रोडवरील श्री खोलेश्वर गणपती मंदिर चौकात रस्तारोको आंदोलन करण्यात आले.

काही तासांच्या घडामोडीसह झालेल्या चर्चेनंतर प्रभारी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिलेल्या लेखी आश्वासनंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. दिवसरात्र काम करणाऱ्या नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांसाठी नेवासकरांनी जागृत होऊन त्यांच्या पाठीशी उभे रहाणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन संजय सुखदान यांनी यावेळी बोलताना केले.

गेल्या चार ते पाच महिन्यापासून थकीत असलेले वेतन नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांना मिळावे यासाठी एक आठवडा अगोदरच नगरपंचायतच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले होते.मात्र त्याकडे दुर्लक्ष करत कोणताही तोडगा न काढल्याने आज

सकाळी ८ वाजता नगरपंचायत चौकात नगरपंचायत कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सनी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू केले होते दुपारी बारा वाजेपर्यंत उपोषण स्थळी कोणताही अधिकारी न आल्याने संजय सुखदान यांनी पुढाकार घेत सर्वांना बरोबर घेत सर्वप्रथम नगरपंचायत चौकात उपोषणस्थळी रास्तारोको केला. त्यानंतर दुपारी १२.४५ वाजता श्रीरामपूर रोडवरील श्रीखोलेश्वर मंदिर चौकात सर्व कर्मचाऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.यावेळी भाजपचे मनोज पारखे,हरीश चक्रनारायण,विकास चव्हाण यांची भाषणे झाली.

   श्रीरामपूर येथील मुख्याधिकारी यांच्याकडे नेवासा नगरपंचायत चा चार्ज आहे त्यामुळे सहायक पोलिस निरीक्षक विजय ठाकूर व तहसीलदार सुराणा यांच्या मध्यस्थीने काही वेळा करिता रास्तारोको थांबवण्यात आला त्यानंतर सलग दीड तास गणपती मंदिराच्या समोर बसून कर्मचाऱ्यांनी मुख्याधिकारी श्रीरामपूर येथून येईपर्यंत उपोषण केले. 

त्यानंतर झालेल्या चर्चेनंतर मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी थकीत वेतनापैकी ऑक्टोबर महिन्यातील वेतन १ फेब्रुवारी तर नोव्हेंबर २०२० चे वेतन १५ फेब्रुवारी पर्यंत करण्यात येईल असे लेखी दिल्याने उपोषण सह आंदोलन स्थगीत करण्यात आले.

यावेळी बोलताना संजय सुखदान म्हणाले की जेव्हा सर्व नगरपंचायतचे कर्मचारी नगरपंचायत चौकात उपोषणाला बसले तेव्हा कोणीही त्यांची दखल घेतली नाही गावाच्या आरोग्यासाठी अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांना पाठिंबा देण्याच्या उद्देशाने आम्ही त्यांना पाठबळ देण्याचे ठरवले अगोदर अधिकारी यांना संपर्क केला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिले तसेच कर्मचाऱ्यांना देखील होणाऱ्या आंदोलनाला आपणास जबाबदार राहाल असे नोटीसीद्वारे सांगितल्याने आम्ही सर्वांना बरोबर घेऊन आजचे हे आंदोलन केले त्यामध्ये आमचा कोणताही राजकीय उद्देश नव्हता,खरे तर या आंदोलनाला नेवासकर जनतेने पाठीशी राहून पाठबळ देणे गरजेचे होते पण तसे झाले नाही अहोरात्र कष्ट करत आपले आरोग्य जपणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी नेवासकरांनी खंबीरपणे उभे रहावे असे आवाहन केले.

यावेळी मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दोन महिन्यांचे वेतन अदा करण्याचे लेखी आश्वासन दिले यावेळी कार्यालयीन अधीक्षक रविंद्रकुमार गुप्ता कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सनी चव्हाण,दीपक सोनवणे,अजय त्रिभुवन, अस्लम शेख,इसाकभाई इनामदार, जयदेव जमधडे यांच्यासह सफाई कामगार महिला, पाणीपुरवठा आणि स्वच्छता कर्मचारी उपस्थित होते.

❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment