राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे वातावरण तापले. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 4, 2021

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे वातावरण तापले. | C24Taas |

राहुरी तालुक्यात ग्रामपंचायतींचे वातावरण तापले. | C24Taas |

राहुरी ( प्रतिनिधी, मनोज साळवे. ) - राहुरी तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकींचे वातावरण चांगलेच तापले आहे. अर्ज माघारीच्या दिवशी गाव पुढार्‍यांना अपक्ष अर्जदारांच्या पायघड्या घालताना नाकीनऊ आल्याचे दिसून आले. एकही ग्रामपंचायत बिनविरोध झाली नसल्याची माहिती प्रशासनाकडून मिळाली आहे. सर्वच ठिकाणी दुरंगी लढत असून कोळेवाडी ग्रामपंचायतीमध्ये वंचित बहुजन आघाडीने पॅनल उभा करीत तिरंगी लढत निर्माण केली आहे.

          राहुरी तालुक्यातील वांबोरी, उंबरे, अंमळनेर, आंबी, बाभूळगाव, चांदेगाव, चेडगाव, चिंचाळे, चिंचविहीरे, दवणगाव, धानोरे, गणेगाव, गुहा, गुंजाळे, जांभळी, जांभूळबन, वावरथ, कणगर खुर्द, करजगाव, कात्रड, केंदळ बु., केसापूर,  खडांबे बु, कोळेवाडी, कोपरे, शेनवडगाव, कुक्कढवेढे, कुरणवाडी, लाख, मल्हारवाडी, पाथरे खु, पिंपळगाव फुणगी, पिंप्री अवघड, राहुरी खुर्द, रामपूर, संक्रापूर, सात्रळ, तांभेरे, तांदूळनेर, तिळापूर, वडनेर, वळण, वांजूळपोई, वरशिंदे, वरवंडी या गावातील ग्रामस्थांची एकच एकच गर्दी महसूल आवारात दिसून आली. बिनविरोध झालेल्या सदस्यांनी महसूल आवारातच गुलाल उधळल्याचे चित्र होते. तर सर्वच ग्रामपंचायतीच्या निवडणूक मंडपासमोर गाव पुढार्‍यांची अपक्ष उमेदवारांपुढे लोटांगण सुरू होते. काहींनी गाव पुढार्‍यांचा शब्द न पाळल्याने शाब्दीक चकमकही दोन ते तीन ठिकाणी घडल्याचे दिसून आले. उंबरे ग्रामपंचायतीसाठी काही उमेदवार तीन वाजेनंतर अर्ज माघारीसाठी हजर झाले. यावेळी अधिकार्‍यांनी अर्ज माघार घेण्यास नकार दिल्याने गाव पुढार्‍यांची व अधिकार्‍यांची शाब्दीक चकमक जुंपली होती. तहसीलदार फसियोद्दीन शेख व नायब तहसीलदार गणेश तळेकर यांनी वाद घालणार्‍यांनी कोर्टात जावे. निवडणूक अधिकार्‍यांशी वाद घालू नये अशी तंबी दिली. सायंकाळी उशिरापर्यंत राहुरी महसूल कार्यालयामध्ये गर्दी जमा होती. ४४ ग्रामपंचायतीच्या  निवडणुकांचे चित्र रात्री उशिरा पर्यंत घोषित केले जाईल अशी माहिती महसूल प्रशासनाने दिली आहे.

No comments:

Post a Comment