नेवासा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने अभिवादन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 3, 2021

नेवासा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने अभिवादन. | C24Taas |

नेवासा : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्ताने सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने अभिवादन. | C24Taas |

 नेवासा ( शंकर नाबदे ) - क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती निमित्ताने सावित्रीबाई फुले/फातिमा शेख सार्वजनिक ग्रंथालयाच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सर्वपक्षीयांसह सर्वधर्मीय नागरिकांच्या वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमप्रसंगी बहुजन समाजाचे नेते संजयभाऊ सुखधान,नितीनभाऊ दिनकर, नगरसेवक सुनीलराव वाघ,

ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ.मोहसीन बागवान, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश सोनटक्के,नगरसेवक असिफभाई पठाण,हायकोर्टातील विधी तज्ञ अँड.शेळके, अँड.प्रकाश संसारे,राजेंद्र खरात,शांताराम गायके,कार्यक्रम संयोजक विकास चव्हाण यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षण चळवळीतील शिक्षिका फातिमा शेख यांच्या प्रतिमेस पूजन पुष्पहार घालून व पुष्पांजली वाहून अभिवादन करण्यात आले.

 यावेळी कु.प्रतिक्षा वाल्हेकर हिने सावित्रीबाई फुलेंचे जीवनकार्य आपल्या तडफदार भाषणातून व्यक्त केले.
यावेळी संजय सुखधान म्हणाले की सावित्रीबाई फुलेंचे कार्य स्त्री शक्तीसाठी स्फूर्तीदायक असून त्यांचा कार्याचा आदर्श समाजाने घ्यावा शैक्षणिक क्रांती होण्यासाठी मुलींनी उच्च शिक्षण घेण्यासाठी संकल्प करावा यासाठी आपण ही योगदान देऊ अशी ग्वाही देऊन अभिवादन केले.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष नितिन दिनकर तसेच डॉ. मोहसीन बागवान,विश्वास वैरागर,अँड प्रकाश संसारे,अँड. शेळके,प्रकाश सोनटक्के यांनी आपल्या भाषणातून सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार्य विषद केले.
या कार्यक्रमाप्रसंगी संयोजन समितीचे उपाध्यक्ष प्रकाश चव्हाण,शुभम चव्हाण,लक्ष्मण चव्हाण,अनिल चव्हाण,
कैलास चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते दीपक सोनवणे, अजय त्रिभूवन,सनी चव्हाण,किशोर ताकवणे,ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह समितीचे सदस्य उपस्थित होते.पत्रकार सुधीर चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले तर संयोजक विकास चव्हाण यांनी उपस्थितांचे आभार मानले.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment