नेवासा येथील मनसे पदाधिकाऱ्यांच्यावतीने राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने संपूर्ण महाराष्ट्रभर ऊर्जामंत्री व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात येत असून त्याच प्रमाणे नेवासा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांना निवेदन देण्यात आले.
त्याप्रसंगी मनसेच्यावतीने सांगण्यात आले की, लॉकडाऊनच्या कालावधीत लोकांच्या हाताला काम - धंदा नसल्याकारणाने तथा आर्थिक उत्पन्न नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती,अशात ते भरमसाठ आलेली विजबिले भरणार तरी कशी ? यामुळे सर्व वीज ग्राहकांचे विज बिल माफ करण्यात यावी अशा अशयाचे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात दिले जात आहे, याबाबत मनसेच्यावतीने मागे मोर्चे काढून आंदोलनेही करण्यात आले होते, याची दखल घेऊन
महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिवाळीच्या सणाच्या वेळेस तमाम महाराष्ट्रातील जनतेला वीज बिलामध्ये सवलत देऊन गोड बातमी देऊ असे आश्वासन दिले होते, त्यामुळे नागरिकांनी लाईट बिल भरले नाही, परंतु ज्यांनी मंत्रीमहोदयांच्या शब्दावर विश्वास ठेवून लाईट बिल भरले नाही आशा नागरिकांना भरमसाठ व्याज लावून पुन्हा जास्तीचे लाईट बिल पाठविण्यात आले, तसेच काही दिवसांपूर्वी संबंधित मंत्र्यांनी व अधिकार्यांनी लाईट बिल शक्तीने वसूल करावे व जे लोकं लाईट बिल भरणार नाही अशांचे लाईट कट करण्याचे आदेश देण्यात आले, त्यामुळे महाराष्ट्राचे ऊर्जामंत्री नितीन राऊत तसेच उर्जा सचिव व महावितरण अधिकारी यांच्या विरोधात संगनमत करुन मानसिक क्लेश, आर्थिक लुबाडणूक व फसवणुक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा असे नेवासा येथील मनसेच्यावतीने पोलीस स्टेशनला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment