नेवासा तालुक्यातील तामसवाडी शाळेचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव. | C24Taas |
नेवासा - जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर आणि शिक्षण विभाग जिल्हा परिषद अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मतदार जनजागृती मोहिमेअंतर्गत घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रांगोळी स्पर्धेत जि. प. प्रा. शाळा, तामसवाडी, ता. नेवासा या शाळेने अहमदनगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेचे बक्षीस वितरण मा. जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले साहेब यांच्या हस्ते नुकतेच नियोजन भवन येथे करण्यात आले. दरवर्षी 25 जानेवारी रोजी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त मतदार जागृतीसाठी शाळा स्तरांवर विविध स्पर्धांचे आयोजन केले जाते.
यातील रांगोळी स्पर्धेत तामसवाडी जिल्हा परिषद शाळेतील समृद्धी कर्जुले, श्रुती कर्जुले,कोमल फोपसे,माधुरी नेमाणे,पूर्वा खपके या विद्यार्थीनींनी जिल्ह्यात प्रथम येण्याचा मान मिळवला.बक्षीस वितरण कार्यक्रमास जिल्ह्यातील विविध विभागातील अधिकारी उपस्थित होते.विद्यार्थिनींना मुख्याध्यापिका सौ. चक्रनारायण मॅडम, उपाध्यापक श्री.संतोष शिंदे सर, श्रीम.खेसे मॅडम, श्रीम. गायकवाड मॅडम, श्रीम. पातोडे मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले.
या जिल्हास्तरीय यशाबददल शिवाजी शिंदे , शिक्षणाधिकारी प्राथमिक , रावसाहेब कांगुणे, सभापती नेवासा, सुलोचना पटारे, गट शिक्षणाधिकारी नेवासा, विस्तार अधिकारी शिवाजी कराड, सुनिता चन्ना, विद्यादेवी सुंबे , केंद्र प्रमुख जाधव यांसह शिक्षक नेते . संजय कळमकर, भास्कर नरसाळे आदिँनी अभिनंदन केले आहे,❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇
No comments:
Post a Comment