भेंडा परिसरात कृषी पपं केबल चोरांचा धुमाकूळ ;शेतकरी हैराण. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Monday, January 25, 2021

भेंडा परिसरात कृषी पपं केबल चोरांचा धुमाकूळ ;शेतकरी हैराण. | C24Taas |

भेंडा परिसरात कृषी पपं केबल चोरांचा धुमाकूळ ;शेतकरी हैराण

 नेवासा - भेंडा परिसरासह संपूर्ण नेवासा तालुक्यात केबल चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून वारंवार होत असलेल्या  कृषी पंप व केबल चोरीने शेतकरी हैराण झाले आहेत.गेल्या अनेक महिन्यापासून तालुक्यात आणि भेंडा गावा परिसरात 

    शेतकऱ्यांच्या शेतातील विहिरीतील पाणबुडी पंप व सबमर्सिबल पंपाच्या केबल चोरीच्या घटना घडत आहेत.शनिवार दि.23 जानेवारी रोजी रात्री अज्ञात चोरट्यांनी भेंडा-जेऊर रस्त्यावरील शेतकऱ्यांच्या  स्टार्टर पासून पंपा पर्यंतच्या केबल कापून नेल्या.

   एकाच रात्रीत सुमारे 40 ते 50 शेतकऱ्यांच्या कृषी पंपांच्या  केबल चोरांनी चोरून नेल्या आहेत.केबल कापताना सबमर्सिबल पंपाला अगदी खेटून कापल्याने नवीन केबलचा जोड ही देता येत नसल्याने चैन ब्लॉकचे सहाय्याने पाईप वर घेऊन केबलचा जोड द्यावा लागत असल्याने चैन ब्लॉकचे भाडे व मजुरी साठी 1500 रुपये मोजावे लागत आहे,नवीन केबल खरेदीचा खर्च वेगळाच.नवीन एक मीटर केबल घेण्यासाठी 50 ते 100 रुपये खर्च येत आहे.

त्यामुळे पोलिसांनी या केबल चोरट्यांचा बंदोबस्त करावा तसेच चोरीचा माल विकत घेणाऱ्या भंगार खरेदी व्यावसायिकांची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment