नेवासा तालुक्यात दोन वेगवेगळे अपघात, एक ठार तर एक गंभीर जखमी. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 23, 2021

नेवासा तालुक्यात दोन वेगवेगळे अपघात, एक ठार तर एक गंभीर जखमी. | C24Taas |

नेवासा तालुक्यात दोन वेगवेगळे अपघात, एक ठार तर एक गंभीर जखमी. | C24Taas |

 नेवासा तालुक्यात नेवासा - शेवगाव रस्त्यावर नागापूर व सौंदळा गावाजवळ झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात एक जण ठार तर एक जण गंभीर झाला आहे.

    समजलेली माहिती अशी आहे की आज दि.23 रोजी दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातात टाटा कंपनीची इंडिका व्हिस्टा नागापूर फाट्याजवळ पलटी होऊन रस्त्याच्या खाली गेल्याने त्या अपघातात गणेश कंदनवाल (वय 40 वर्षे) ही व्यक्ती ठार झाला तर विक्रम सुरेश बोकणे यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे.सदर गाडीतील इसम हे बीड जिल्ह्यातील गेवराई येथून शिर्डी येथे उपचार घेत असलेल्या रुग्णाला आणण्यासाठी जात होते. 


   तर दुसरा अपघात सौंदळा गावाजवळ स्कॉर्पिओ पलटी होऊन रस्त्याच्या खाली गेली. या अपघातात एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर या अपघातात जखमी झालेले यांची नावे पुढील प्रमाणे : गणेश खेत्रे ( वय 20 वर्षे ),राजू यादव ( वय 30 वर्षे ) , काकडे ( वय 40 वर्षे ) असे जखमींची नावे आहेत. हे सर्व जखमी व्यक्ती बीड जिल्ह्यातील गेवराई येथून नेवासा फाट्याकडे येत होते.

भेंडा येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश गव्हाणे हे नेवासा येथून भेंड्याकडे जात असताना सौंदाळा येथे झालेला अपघात बघितल्यानंतर त्यांनी क्षणाचाही विलंब न करता अपघातग्रस्तांना त्यांच्या गाडीमध्ये नेऊन काही मिनिटातच नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटल येथे पोहच केले.

रस्त्यावर कित्येक गाड्या उभ्या असून देखील कोणी मदतीला आले नाही मात्र आमची मात्र ओळख नसतानाही गणेश गव्हाणे हे मदतीला धावून येऊन आम्हाला नेवासा फाटा येथे उपचारासाठी आणले त्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो अशी प्रतिक्रिया अपघातातील जखमी विक्रम बोकन यांनी दिली.❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment