राहुरी - अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना ; अपहरणचा गुन्हा दाखल. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 21, 2021

राहुरी - अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना ; अपहरणचा गुन्हा दाखल. | C24Taas |

 राहुरी - अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना ; राहुरी पोलीस स्टेशनला अपहरणचा गुन्हा दाखल. | C24Taas |

राहुरी ( प्रतिनिधी - मनोज साळवे ) बाथरूमला गेलेल्या अल्पवयीन मुलीला अज्ञात इसमाने पळवून नेल्याची घटना राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथे दिनांक १९ जानेवारी रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत अज्ञात इसमा विरुध्द अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        राहुरी तालुक्यातील पाथरे खुर्द येथील एक १७ वर्षीय अल्पवयीन मुलगी दिनांक १९ जानेवारी रोजी रात्री आठ वाजे दरम्यान बाथरूमला जाते असे सांगून घरातून बाहेर गेली होती. यावेळी तिला कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी तिच्या वडिलांच्या रखवालीतून जबरदस्तीने पळवून नेले. तिला काहीतरी आमिष दाखवून पळवून नेल्याचे तिच्या वडिलांनी सांगितले. 

      त्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या वडिलांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत अपहरणचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सोमनाथ जायभाय हे करीत आहेत.No comments:

Post a Comment