शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले शनी दर्शन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 2, 2021

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले शनी दर्शन. | C24Taas |

शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी घेतले शनी दर्शन. | C24Taas |

 नेवासा - शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी वर्षाच्या पहिल्याच शनिवारी शनी शिंगणापूर येथे येऊन शनी चवथऱ्यावर जाऊन शनी अभिषेक व महाआरती केली. मुळा शैक्षणिक संस्थेच्या हेलिपॅडवर त्यांचे आगमन झाले होते.

भाविकांनी नवीन वर्षाच्या पहिल्या शनिवारी शिंगणपुरात दर्शनाचा लाभ घेतला. दिवसभर मोठी गर्दी झाली होती.सायंकाळची महा आरती मिलिंद नार्वेकर यांच्या हस्ते झाली. 

उदासी महाराज मठात नार्वेकर यांनी पत्नी मीरा नार्वेकर यांच्या सोबत शनी अभिषेक केला.नूतन विश्वस्त भागवत बानकर व आप्पासाहेब शेटे यांनी नार्वेकर यांचा शाल,श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. 

सत्काराला उत्तर देतांना मिलिंद नार्वेकर म्हणाले की अनेकदा दर्शनासाठी येत असतो प्रत्येक वेळेस मोठे समाधान व ऊर्जा मिळत असते.शनी महाराजांचा महिमा हा भारतात नसून संपूर्ण जगात आहे.देशावर कोरोनाचे जे संकट आले आहे ते लवकर दूर होण्यासाठी मी प्रार्थना केली आहे.यावेळी विश्वस्त आप्पासाहेब शेटे,भागवत बानकर,जनसंपर्क अधिकारी अनिल दरंदले,राजेंद्र गुगळे,माजी विश्वस्त योगेश बानकर , उपस्थितीत होते .


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment