नेवासा - मुळा कारखाना निवडणूक बिनविरोध ; ना.शंकरराव गडाख यांचे वर्चस्‍व कायम. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Tuesday, January 19, 2021

नेवासा - मुळा कारखाना निवडणूक बिनविरोध ; ना.शंकरराव गडाख यांचे वर्चस्‍व कायम. | C24Taas |

 नेवासा - मुळा कारखाना निवडणूक बिनविरोध ;

ना.शंकरराव गडाख यांचे वर्चस्‍व कायम. | C24Taas |

नेवासा तालुक्यातील मुळा सहकारी साखर कारखान्‍याच्‍या निवडणूकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्‍याची मुदत आज मंगळवारी संपल्‍यावर निवडणूक निर्णय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी मुळा सहकारी साखर कारखान्‍याची निवडणूक बिनविरोध झााल्‍याचे जाहीर करत अविरोध निवडून आलेल्‍या २१ उमेदवारांची नावे जा‍हीर केली. या निवडणूकीतही राज्‍याचे जल संधारण मंत्री ना.शंकरराव गडाख यांचे एक हाती नेतृत्‍व पुन्हा कायम राहीले आहे.जेष्ट नेते यशवंतराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली मुळा कारखान्याची वाटचाल चालू आहे . 


 निवडणूक निर्णय अधिका-यांनी मतदार संघ निहाय घोषित केलेल्‍या उमेदवारांची नावे पुढील प्रमाणे आहेत....

उत्‍पादक सभासद सोनई गट – १) डफाळ कारभारी काशिनाथ २) गडाख शंकरराव यशवंतराव 

घोडेगांव गट - १) चौधरी बाबुराव ज्ञानदेव २) पांढरे लक्ष्‍मण तुळशीराम 

खरवंडी गट – १) मोटे भाऊसाहेब निवृत्‍ती २) शेटे बापुसाहेब शंकर

करजगांव गट – १) जंगले संजय पोपटराव २) दरंदले बबन पुंजाजी ३) टेमक दामोधर दशरथ

नेवासा गट – १) पाटील निलेश विठ्ठलराव २) लोखंडे नारायण सुर्यभान ३) भणगे बाबासाहेब शिवाजी

Telegram वर नेवासा तालुक्यातील बातम्यासाठी ग्रुप जॉईन करा.👇

https://t.me/joinchat/UCwN4RfgabcMDx9hKhYYBg


प्रवरासंगम गट – १) पाटील बाळासाहेब दादा २) गोरे बाळासाहेब आसाराम ३) कर्डिले कडूबाळ बाबूराव

संस्‍था मतदार संघ – १) तुवर नानासाहेब काशिनाथ 

अनु‍सुचित जाती-जमाती मतदार संघ – १) गायकवाड कडूबाळ कचरु

महिला प्रतिनिधी – १) पंडीत ताराबाई सुखदेव २) जंगले अलका रंगनाथ

इतर मागास वर्गीय मतदार संघ – १) बनकर बाळासाहेब एकनाथ 

भटक्‍या विमुक्‍त जाती मतदार संघ – १) परदेशी बाळासाहेब बाबुलाल

 सुरवातीला मुळा कारखान्‍याच्‍या निवडणूकीत एकुण १३८ उमेदवारी अर्ज पात्र ठरले होते त्‍यापैकी ११७ उमेदवारांनी माघार घेतल्‍याने निवडणूक बिनविरोध घोषित करण्‍यात आली.मुळा कारखान्‍याचे संस्‍थापक माजी.खासदार यशवंतरावजी गडाख यांनी व त्‍यानंतर नामदार शंकरराव गडाख यांनी या कारखान्‍याची धुरा संभाळली. ऊसाचे दर चांगले मिळत असल्‍याने तालुक्‍यात ऊसाची शेती बहरली. क्षमतेपेक्षाही जादा ऊसाची निर्मिती होऊ लागली. त्‍यामुळे सुरवातीचा १२०० टनी कारखाना ५००० टनी करावा लागला. ऊस जादा झाला तरी तोटे सहन केले पण गाळपाविना शेतात ऊस ठेवला नाही. साखर कारखान्‍याला डिस्‍टीलरीची जोड दिली. विजेचा मोठा प्रकल्‍प उभारला. इथेनॉलचा प्रकल्‍प कार्यान्‍वीत होणार आहे. गळीतातही वाढ केली. रोज ७ ते ८ हजार टन ऊसाचे गळीत होत असल्‍याने चालुवर्षी ऊसाचे उत्‍पादन जादा असुनही शेतक-यांमध्‍ये सामसुम आहे.


आपल्‍या ऊसाचे वेळेत गाळप होईल याची शाश्‍वती त्‍यांना आहे. एकुणच कारखाना चांगला चालल्‍यामुळे सभासद व ऊस उत्‍पादक शेतक-यांमध्‍ये समाधानाचे वातावरण आहे. सभासद व ऊस उत्‍पादकांच्‍या हिताचे निर्णय घेण्‍याची परंपरा या कारखान्‍याने जपली असल्‍याने आणि सभासद किंवा बिगर सभासद यांच्‍या ऊस तोडीत किंवा ऊसाचे दर देण्‍याच्‍या बाबतीत भेदभाव केला जात नसल्‍याने व ऊसाचे दरही चांगले मिळत असल्‍याने पक्षीय किंवा गटा गटाचे राजकारण न आणता सभासद हक्‍काने आपला ऊस या कारखान्‍याला देत असतात. या विश्‍वासावरच आता पर्यंतच्‍या इतिहासात या कारखान्‍याच्‍या सभासदांनी आता पर्यंतच्‍या निवडणूका बिनविरोध किंवा अंशता बिनविरोध केल्‍या आहेत. मुळा कारखान्‍याची निवडणूक बिनविरोध झाल्‍यामुळे अनेक सभासदांनी समाधानाची भावना व्‍यक्‍त केली आहे.
  

सभासदांनी व अर्ज भरलेल्‍या उमेदवारांनी कारखान्‍याच्‍या हिताचा विचार करुन निवडणूक बिनविरोध करण्‍याचा निर्णय घेण्‍यासाठी मनाचा जो मोठेपणा दाखविला त्‍या बद्दल मी त्‍यांचे सर्व सभासदांच्‍या वतीने आभार मानतो. कारखान्‍याच्‍या माध्‍यमातून आतापर्यत सभासद हित जपण्‍याचा सातत्‍याने प्रयत्‍न केला आहे. यापूढच्‍या काळातही सभासदाचा हा विश्‍वास जपण्‍याची आणि सभासदाच्‍या हिताचे निर्णय घेण्‍याची जी परंपरा गडाख साहेबांनी घालून दिली आहे ती कायम राखली जाईल. - नामदार शंकरराव गडाख


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇


No comments:

Post a Comment