शनिभक्तांना संक्रांतनिमित्त तिळगुळ व वाणवाटप शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा उपक्रम. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Thursday, January 14, 2021

शनिभक्तांना संक्रांतनिमित्त तिळगुळ व वाणवाटप शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा उपक्रम. | C24Taas |

शनिभक्तांना संक्रांतनिमित्त तिळगुळ व वाणवाटप शनैश्वर देवस्थान ट्रस्टचा उपक्रम.

नेवासा तालुक्यातील शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मकर संक्रांतनिमित्त महिला भाविकांना वाण म्हणून शनिमहात्म पुस्तक भेट. संक्रांत सणानिमित्त शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महिला शनिभक्तांना तिळगुळ,प्रसाद व वाणवाटप करण्यात आले.या उपक्रमाचे ग्रामस्थांनी स्वागत केले आहे.

 शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या महिला विश्वस्त सौ.सुनिता विठ्ठल आढाव व अध्यक्ष भागवत बानकर यांच्या पत्नी सौ.ज्योती बानकर यांनी स्वयंभू शनिमुर्तीचे चौथ-याखालून संक्रांत पूजन केले.यावेळी ग्रामस्थ महिला सौ.मनिषा अशोक बानकर,सौ.वर्षा अदिनाथ बानकर उपस्थित होत्या.ग्रामस्थ महिलांनी शनिदेवाला सुगड्यातील ववसा वाहून दर्शन घेतले.

उदासी महाराज मठात महिला विश्वस्त सुनिता आढाव,  ज्योती बानकर यांनी भाविक सौ.गायत्री दिपक मराठे,अश्विनी राहुल मराठे,नंदिनी धनंजय मराठे,सुशिला चंद्रकांत मराठे राहणार-जळगाव (जि.जळगाव) यांना वाण म्हणून शनिमहात्म पुस्तक देवून तिळगुळ वाटप केले. आजसंक्रांत सणानिमित्त परीसरातील सर्व मंदीरात ग्रामस्थ महिलांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment