नेवासा तालुक्यातील सोनई येथील रहिवासी बाजीराव पालवे यांची कन्या ॲड.रेणुका घुले-पालवे हिचा केंद्र सरकार अंतर्गत बीट स्टायकून कंपनीच्या वतीने ऑनलाईन विशेष सेवा पुरस्कार देवून सन्मान करण्यात आला आहे. देशातील १ हजार महिलांचा असा सन्मान करण्यात आला आहे.
नवी दिल्ली येथील बीट स्टायकून कंपनीच्या वतीनेउद्योग,व्यावसाय,राजकारण,समाजकारण,वैद्यकीय व न्यायालयीन कामकाजात विशेष योगदान दिलेल्या देशातील एक हजार महिलांची निवड करण्यात आली होती.राज्यातून चार महिलांची पुरस्कारासाठी निवड झाली त्यात ॲड.रेणुका घुले यांचे नाव आहे.
ॲड.घुले या औरंगाबाद उच्च न्यायालयात २७ वर्षापासून प्रॅक्टीस करत असुन त्या मुलांचे लैंगिक अत्याचार व बाल न्याय मंडळावर काम करत आहेत.
No comments:
Post a Comment