नेवासा - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवरासिंह चौहान यांनी घेतले शनीदर्शन. | C24Taas | - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 1, 2021

नेवासा - मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवरासिंह चौहान यांनी घेतले शनीदर्शन. | C24Taas |

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवरासिंह चौहान यांनी घेतले शनीदर्शन.

नेवासा : मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी सायंकाळी आपल्या परीवारासह शनिशिंगणापूरला भेट देऊन दरवर्षीप्रमाणे नववर्षानिमित्त शनिदर्शन घेतले.

सायंकाळी सहा वाजता मुख्यमंत्री चौहानआपल्या परिवारासह आले.त्यांनी उदासी महाराज मठात विधिवत अभिषेक करून आरती घेतली. शनीशिंगणापूर येथे मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसींह चौहान यांचा सत्कार करताना शनैश्वर देवस्थानचे नूतन विश्वस्त. शनिदर्शनाने मनस्वी समाधान लाभले. 

हे तिर्थक्षेत्र ऊर्जा देणारे आहे.देशावर आलेलं करोनाचं संकट टळून सर्वांना सुखसमृध्दी मिळावी, अशी मनोकामना शनिदेवाला केल्याचे चौहान यांनी सांगितले. सायंकाळच्या आरतीचा लाभ घेवून त्यांनी प्रसाद घेतला.

पौरोहित्य अशोक कुलकर्णी यांनी केले. जनसंपर्क कार्यालयात देवस्थान ट्रस्टच्यावतीने विश्वस्त अप्पासाहेब शेटे यांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी नूतन विश्वस्त प्रा. शिवाजी दरंदले, भागवत बानकर, विकास बानकर, बाळासाहेब बोरडे, सुनीता हाव उपस्थित होते.

काल नववर्षाच्या प्रारंभदिनी दिवसभर दर्शनासाठी गर्दी होती.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment