नेवासा ( शंकर नाबदे ) - समाजाचे अनेक प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी प्रकाशभाऊ पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली जनआधार सामाजिक संघटना प्रयत्न करत आहे. याचाच एक भाग म्हणुन नेवासा तालुका जनआधार संघटनेच्या वतीने नेवासा फाटा येथील शरनपुर वृद्धाश्रमातील नागरिकांना थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटरचे वाटप करण्यात आले.
यावेळी तालुका अध्यक्ष अजित वांढेकर,उपाध्यक्ष किरण जावळे,तालुका सचिव बंडू दहातोंडे,संतोष टेमक,अजय शिंदे,हरी भवार,अरूण कापसे,अतिश ढाले,नसीब पठाण,केशव कानडे,माधुरीताई जामदार,कावेरीताई शिंदे ,कोमलताई मोरे,मंगलताई भाकरे,नंदा ताई उगले, शरनपुर वृद्धाश्रमाचे संचालक रावसाहेब मगर,सुरेखा मगर आदीसह तालुका संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार सुधिर चव्हाण यांनी मानले.
जनआधार संघटनेचे अध्यक्ष प्रकाश पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली नवे वर्ष नवा संकल्प म्हणुन शरणपुर वृद्धाश्रमात स्वेटरचे वाटप केले.असे अनेक सामाजिक उपक्रम व अन्यायाला वाचा फोडण्याचे काम संघटनेच्या माध्यमातुन करत आहोत.
अजित वांढेकर (अध्यक्ष,नेवासा तालुका)
No comments:
Post a Comment