राहुरी - कुत्र्याला पाईपने मारल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील आतिश नामक तरूणाने कांता गायकवाड या तरूणाला पाईपने मारहाण केल्याची घटना - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 9, 2021

राहुरी - कुत्र्याला पाईपने मारल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील आतिश नामक तरूणाने कांता गायकवाड या तरूणाला पाईपने मारहाण केल्याची घटना


 राहुरी प्रतिनिधी, 

कुत्र्याला पाईपने मारल्याचा राग आल्याने राहुरी शहरातील आतिश नामक तरूणाने कांता गायकवाड या तरूणाला पाईपने मारहाण केल्याची घटना दिनांक ८ जानेवारी रोजी घडली. याबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी पसार झाला आहे. 

      या घटनेतील फिर्यादी कांता दिनेश गायकवाड हा दिनांक ८ जानेवारी रोजी मोटर सायकलवर जात असताना रस्त्यावर फिरणाऱ्या कुत्र्याने त्यास चावण्याचा प्रयत्न केला. यावेळी कांता गायकवाड याने त्या कुत्र्यास पाईपने मारले. त्याचा राग येऊन आरोपी आतिश नामक तरूणाने फिर्यादी कांता दिनेश गायकवाड याला राहुरी शहरातील शनी मंदिरच्या पाठीमागे असलेल्या भाजी मंडई येथे जाऊन पाइपने उजव्या बाजूस मानेवर व डाव्या बाजूच्या पायाच्या नडगीवर मारले व शिवीगाळ केली.

      कांता गायकवाड वय २१ वर्षे, राहणार तनपूरेवाडी रोड, राहुरी. याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत आतिश नामक तरूणावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रविण खंडागळे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment