नेवासा - शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची निवड. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Friday, January 8, 2021

नेवासा - शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची निवड.

नेवासा - शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर तर उपाध्यक्षपदी विकास बानकर यांची निवड.

 नेवासा तालुक्यातील शनिशिंगणापूर येथील शनैश्वर देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर यांची तर उपाध्यक्ष पदी विकास बानकर यांची निवड करण्यात आली.मागील महिन्यात नगरच्या सहायक धर्मदाय आयुक्तांनी सर्व ८४ अर्जदारांच्या मुलाखती घेवून २३ डिसेंबर रोजी अकरा नवीन विश्वस्तांची निवड जाहीर केली होती.यात दरंदले आडनावाचे तीन तर शेटे व बानकर आडनावाचे दोन व इतर आडनावाचे चार रहिवासी विश्वस्त निवडण्यात आले होते.

आज शुक्रवार दि .8 जानेवारी 2021 रोजी शनेश्वर देवस्थानच्या सभागृहात सकाळी 10 वाजता नवीन विश्वस्थांची बैठक झाली या बैठकीत वरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. 

   देवस्थानच्या अध्यक्षपदी भागवत बानकर,उपाध्यक्ष पदी विकास बानकर,कोषाध्यक्ष पदी दीपक दरंदले, सरचिटणीस पदी बाळासाहेब बोरुडे , चिटणीसपदी आप्पासाहेब शेटे यांची निवड करण्यात आली.

गेल्या 15 दिवसापूर्वी नूतन विश्वस्थ मंडळाची कार्यकारिणी जाहीर झाली होती. नामदार शंकरराव गडाख पाटील यांच्या प्रयत्नांमुळे शनिशिंगणापूर गावातीलच नागिरकांमधूनच विश्वस्थ निवड झाली याची सर्व ग्रामस्थांनी स्वागत केले. नुतन पदाधिका-यांचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी अभिनंदन केले आहे.


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment