राहुरी - दहा दिवसांसाठी वापरण्यासाठी नेलेली स्विफ्ट गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Wednesday, January 6, 2021

राहुरी - दहा दिवसांसाठी वापरण्यासाठी नेलेली स्विफ्ट गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी.

 दहा दिवसांसाठी वापरण्यासाठी नेलेली स्विफ्ट गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी.राहुरी प्रतिनिधी, मनोज साळवे.

वडिल आजारी आहेत. दहा ते पंधरा दिवसांसाठी स्विफ्ट डिझायर गाडी द्या. असे सांगून गाडी नेणाऱ्या दोन आरोपींनी गाडी परत करण्यासाठी पैशाची मागणी करण्यात आली. ही घटना २२ डिसेंबर रोजी राहुरी येथील बस स्थानक परिसरात घडली. याबाबत राहुरी येथील पेरणे व श्रीरामपूर येथील रूपटक्के या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

        दिनांक २२ डिसेंबर २०२० रोजी सकाळी दहा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील रेल्वे स्टेशन, तांदूळवाडी येथील रामदास नामदेव जाधव वय ६० वर्षे. हे राहुरी बस स्थानक जवळ होते. त्यावेळी तेथे आरोपी 1) सचिन भीमाशंकर पेरणे राहणार गोटुंबे आखाडा ता  राहुरी. 2) संजय रुपटक्के (पूर्ण नाव माहित नाही) राहणार, श्रीरामपुर तालुका श्रीरामपूर या दोघांनी रामदास जाधव यांना सांगितले कि, माझे वडिल आजारी आहेत. तूमची स्विफ्ट डिझायर व्हिडीआय कंपनीची एम एच १६- ६५१६ ही गाडी दहा ते पंधरा दिवसांसाठी द्या. असे सांगून गाडी घेऊन गेले. 

       सदर स्विफ्ट डिझायर गाडी परत करण्यासाठी सचिन पेरणे व संजय रूपटक्के या दोन आरोपींनी रामदास जाधव यांच्याकडे पैशाची मागणी केली. याबाबत राहुरी पोलिसांत गुन्हा रजि. नं. व कलम - I 15/2021 भा.द. वी कलम 420, 406 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक प्रविण खंडागळे हे करीत आहेत.

1 comment:

  1. माणसांची नीतिमत्ता च बिघडली आहे

    ReplyDelete