राहुरी- राज्य सरकारने कै. अण्णासाहेब पाटील महामंडळला ४००कोटी रुपयांचा निधीची तरतुद करावी- मराठा एकीकरण समिती - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 30, 2021

राहुरी- राज्य सरकारने कै. अण्णासाहेब पाटील महामंडळला ४००कोटी रुपयांचा निधीची तरतुद करावी- मराठा एकीकरण समिती

राहुरी- राज्य सरकारने कै. अण्णासाहेब पाटील महामंडळला ४००कोटी रुपयांचा निधीची तरतुद करावी- मराठा एकीकरण समिती 

 

राहुरी प्रतिनिधी,

राहुरी येथे उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांची मराठा एकीकरण समितीच्या सदस्यांनी भेट घेवून निवेदन देण्यात आले. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत शैक्षणिक कर्जाचा समावेश करण्यात यावा. कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी मा. नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांची पुन्हा नियुक्ती करण्यात यावी.

राज्यात तत्कालीन मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी दिनांक २५ सप्टेंबर २०१६ ला स्वर्गीय अण्णासाहेब पाटील यांच्या जयंतीनिमित्त माथाडी कामगारांच्या मेळाव्यात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ करिता २०० कोटी रुपयांचा भरीव निधी देण्याची घोषणा केली. राज्यांमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या मागणीवरून सन २०१७ मध्ये मराठा समाजा करिता अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ नवीन तीन योजनांची घोषणा करून भरघोस आर्थिक मदतीची तरतूद केली. त्या अनुषंगाने नागपुर अधिवेशन सन २०१६-१७ मध्ये २०० कोटी रुपये व सन २०१७-१८ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये २०० कोटी रुपये अशी शासन निर्णय दिनांक ३१ मार्च २०१७ नुसार ४०० कोटी रुपयांची भरघोस निधीची तरतूद करण्यात आली होती. त्या रकमेतील १०० कोटी रुपये महामंडळास वर्ग करावे. अशी मागणी महामंडळाने शासनाकडे केली व त्यानुसार २०१९ रोजी ७० कोटी रुपये निधी महामंडळाला शासनाकडून वर्ग करण्यात आला.

       राज्यामध्ये महामंडळाच्या योजनेअंतर्गत २१ हजार ७३१ लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज वाटप करण्यात आले आहे. त्यानुसार महामंडळाकडून लाभार्थ्यांना ८९ कोटी ८५ लाख रुपयांचा व्याज परतावा करण्यात आलेला आहे. सदर योजना अत्यंत पारदर्शी असल्याचा अभिप्राय महामंडळाला सतत मिळत असतात. या योजनेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे बँकांकडून कर्ज वाटप झालेल्या लाभार्थ्यांमध्ये एकही कर्ज थकविले थकबाकीदार नाही.

महामंडळा मार्फत विविध योजनांचा लाभ घेत असताना ५ वर्ष मुदत आहे. ती ७ वर्षे करणे आणि ज्यांनी योजनेतून लाभार्थ्यांचे कर्ज घेतलेले आहे व त्यांची परत दोन वर्षे नियमितपणे लाभार्थ्यांनी केली आहे. त्यांना उद्योग वाढवण्यासाठी वाढीव कर्ज घेता येईल. असाही महामंडळाचा प्रयत्न आहे, असे मा. अध्यक्ष नरेंद्रजी पाटील साहेब यांच्याकडून सांगण्यात आले आहे.                                                                                आदरणीय मंत्रीसाहेब राज्य सरकारने कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ करिता ४०० कोटी रुपयांची तरतूद होणे गरजेचे असल्याने तशी तरतूद करण्यात यावी. अशी नम्र विनंती करण्यात येत आहे. तसेच मराठा समाजातील विद्यार्थांचे शैक्षणिक कर्ज हे कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा मार्फत देण्यात यावे. माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी कै. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्रातील तालुके दौरे करून २०,००० मराठा उद्योजक तयार केले आहेत. भविष्य काळात एक लाख मराठा उद्योजक तयार करण्यासाठी मा. नरेंद्र पाटील याची पुन्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात यावी ही विनंती. निवेदन देण्याकरीता देवेंद्र लांबे, संदीप गाडे, राजेंद्र लबडे, अविनाश क्षिरसागर आदि उपस्थित होते.

No comments:

Post a Comment