राहुरी - रस्त्याच्या वादातून आजी व नातवाला मारहाण. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 3, 2021

राहुरी - रस्त्याच्या वादातून आजी व नातवाला मारहाण.

 राहुरी - रस्त्याच्या वादातून आजी व नातवाला मारहाण.

राहुरी - ( प्रतिनिधी, मनोज साळवे. ) घराच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावरून वाद निर्माण होऊन आजी व नातवाला लाथा बुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना २८ डिसेंबर रोजी राहुरी तालुक्यातील टाकळीमियॉ येथे घडली असून राहुरी पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. 

       दिनांक २८ डिसेंबर २०२० रोजी फिर्यादी कासूबाई बाबूराव वांडेकर वय ७० वर्ष राहणार टाकळीमियॉ ता. राहुरी. ह्या महिला त्यांच्या नातवा बरोबर त्यांच्या घरासमोर उभे होते. यावेळी आरोपी सुनिता प्रकाश चिंधे व प्रकाश दामोदर चिंधे दोघे राहणार टाकळीमियॉ हे फिर्यादी कासूबाई वांडेकर यांना म्हणाले की, तूम्ही मागच्या दाराने वागा. तेंव्हा कासूबाई म्हणाल्या की, आम्ही मागच्या दाराने वागतो. तूम्ही पण मागच्या दाराने वागा. असे म्हणाल्याचा राग आल्याने कासूबाई यांच्या नातवाची गचांडी धरली. तेंव्हा कासूबाई सोडवण्याचा गेल्या असता आरोपींनी त्यांच्या उजव्या पायावर लाथ मारून खाली ढकलून दिले. लाथाबुक्याने मारहाण करून दमदाटी केली. 

       कासूबाई बाबूराव वांडेकर यांच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीसांत सुनिता प्रकाश चिंधे व प्रकाश दामोदर चिंधे या दोघांविरुद्ध गु. र. नं. व कलम  I 04/2021 आयपीसी 324, 338, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार प्रभाकर शिरसाठ हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment