नेवासा - कळसुबाईचे शिखर नेवाश्याच्या तीन चिमुकल्या साहसवीरांनी अडथळ्यांवर मात करीत पहिल्याच प्रयत्नात सर केले. - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Sunday, January 24, 2021

नेवासा - कळसुबाईचे शिखर नेवाश्याच्या तीन चिमुकल्या साहसवीरांनी अडथळ्यांवर मात करीत पहिल्याच प्रयत्नात सर केले.

नेवासा - कळसुबाईचे शिखर नेवाश्याच्या तीन चिमुकल्या साहसवीरांनी अडथळ्यांवर मात करीत पहिल्याच प्रयत्नात सर केले.

 नेवासा - मिनी एव्हरेस्ट म्हणून ओळख असलेले  जिल्ह्यातील कळसुबाई शिखर नेवाश्याच्या तीन चिमुकल्या साहसवीरांनी अडथळ्यांवर मात करीत पहिल्याच प्रयत्नात सर केले.जिल्ह्यातील कळसुबाई शिखर हे ५४०० फूट उंच व चढायला अवघड आहे.नेवासा येथील ओम साई ट्रेकिंग व सायकलिंग ग्रुपचे प्रशांत बडाख,दिलीप गिरी,चंद्रकांत सेवक,भारत गोरे,आदित्य सेवक,श्रेयस शर्मा,श्रुतिका शर्मा,पूजा गोरे यांनी पाच वर्षांचा रुद्रा गिरी,पाच वर्षांचा अर्णव बडाख व नऊ वर्षांची अवनिका बडाख या तीन चिमुकल्यांसह कळसुबाई शिखर सर केले.

कळसूबाई चढण्याचा अनुभव थरारक होता.या तिघा चिमूकल्यासह त्यांचे पालकही या मोहिमेत सहभागी झाले होते.खास गिर्यारोहकांची वाट म्हणून ओळखली जाणारी बारी या रस्त्याद्वारे चढाईला सुरुवात केली व  कळसूबाईच्या मोहिमेवर त्यांनी फत्ते मिळविली.सकाळी अकरा वाजता सुरवात केली शिखरावर जाण्यासाठी तीन तास वेळ लागला तर परतीला दोन तासांचा अवधी लागला.मात्र मुलांनी कुठेही न डगमगता मोहिम यशस्वीपणे पार केले.या तीन चिमुकल्यांच्या नियमित सरावांमुळे हे कठीण शिखर सर शक्य झाले आहे. कळसुबाई शिखर सर करण्याचे आव्हान या तिघा चिमूकल्यांनी पहिल्या प्रयत्नात पूर्ण केले.तर या तीन चिमुकल्यांनी रतनगड ही सर केला आहे.


कोरोनामुळे सध्या शाळा बंद असल्याने आई-वडीलांसोबत कळसुबाई येथे आम्ही गेलो.येथे ट्रेकिंग करतांना भरपूर आनंद मिळाला.यानंतर ही ट्रेकिंग सुरू ठेवणार आहोत.

अवनिका बडाख.(चिमुकली ट्रेकर)

ग्रामीण भागात ट्रेकिंग व सायकलिंगचे महत्व रुजविण्याचे आमचा ग्रुप काम करत असून शारीरिक तंदुरुस्ती कडे सर्वांनी लक्ष देणे गरजेचे असून नियमीत व्यायाम करणे अवश्यक असल्याचे मत प्रशांत बडाख यांनी व्यक्त केले.


कळसुबाई हे शिखर सर करण्याचे कोणत्याही ट्रेकर्सचे अगदी सुरुवातीच्या टप्प्यातील स्वप्न असते.हे शिखर सर करण्यासाठी अनुभवी ट्रेकर्सची देखील चांगलीच दमछाक होते.मात्र रुद्रा,अवनिका व अर्णव यांना सोबत घेत हे शिखर सर केले त्यांनी ही पहिल्याच प्रयत्नात हे आव्हान पूर्ण केले आहे.ही कामगिरी खरोखर कौतुकास्पद असून पुढील काळात ही त्यांना ट्रेकिंगसाठी प्रोत्साहन देत विविध शिखरांवर चढाई करणार आहोत.

दिलीप गिरी (रुद्राचे वडील)


❗ नेवासा तालुक्यातील Live बातम्या पाहण्यासाठी फेसबुक ग्रुप जॉईन करा.👇

No comments:

Post a Comment