राहुरी प्रतिनिधी,
राहुरी तालुक्यातील चिंचोली फाटा येथील हॉटेल नंदादीप मध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायावर श्रीरामपूर येथील उप विभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांनी छापा टाकून कारवाई केली. या दरम्यान हाॅटेल मालक सुनिल हारदे याला ताब्यात घेऊन दोन पर प्रांतीय महिलांची सुटका केली.
दि. २ ९ जानेवारी २०२१ रोजी राहुरी पोलीस स्टेशन येथे श्रीरामपूर येथील उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके हे हजर असताना त्यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, चिंचोली गावचे शिवारात नगर मनमाड रोडचे कडेला असलेले हॉटेल नंदादिप या ठिकाणी हॉटेल चालक व मालक हे कुंटणखाना चालवीत आहे. आता गेल्यास ते मिळून येईल. अशी गुप्त बातमी मिळाल्याने सदर बातमी पो. नि. हनुमंतराव गाडे यांना समजावून कारवाई करणेकामी सांगितले. यावेळी दोन पंच व छापाकामी एक बनावट ग्राहक तयार करून त्यांना नमूद छाप्याचा उद्देश समजावून सांगून राहुरी पोलीस स्टेशन येथून उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके, पो. नि. हनुमंतराव गाडे व राहुरी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपुर भाग यांचे भरारी पथकातील पोलीस कर्मचारी अशांनी सरकारी वाहनाव्दारे बातमीतील नमुद ठिकाणचे अलीकडे वाहन थांबवून सदर बातमीतील नमुद कुंटणखाना चालू असलेबाबत खातरजमा करणेकामी बनावट ग्राहक म्हणुन तयार केलेले इसमास हॉटेल नंदादिप येथे पाठविले. त्याने काही वेळातच मोबाईलवरुन बातमी खरी असलेबाबत माहिती दिली. सदर ठिकाणी पोलीस स्टाफ व पंच अशांनी दुपारी ३ वा. चे सुमारास अचानक छापा टाकला. हॉटेल काऊंटरवर असणारे इसमास त्याचे नांव गांव विचारले त्याने त्याचे नाव सुनिल रामचंद्र हारदे वय ३५ वर्षे रा. येवले आखाडा ता. राहुरी असे असल्याचे सांगुन तो हॉटेल मालक असलेबाबत सांगितले. त्यानंतर सदर इसमास पोलीसांची व पंचाची ओळख करुन देवुन छाप्याचा उददेश समजावुन सांगुन लॉजिंग चेक केले. यावेळी दोन महिला मिळुन आल्या. त्यांना विश्वासात घेवुन त्यांना अधिक विचारपुस केली असता त्यांनी पश्चिम बंगाल मधील फरगनास येथून आणलेले असलेबाबत सांगितले. सदर ठिकाणाची झाडाझडती घेतली असता निरोधाची पाकिटे व बनावट ग्राहकाकडील वापरण्यात आलेल्या नोटा मिळुन आल्याने जप्त करण्यात आल्या.
पिडीत महिलांची योग्य समुपदेशन करणेकामी त्यांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. सदरबाबत आरोपीनामे सुनिल रामचंद्र हारदे वय ३५ वर्षे रा. येवले आखाडा ता. राहुरी. याचेविरोधात राहुरी पोलीस स्टेशनला गुर नं.॥ ९४/२०२१ स्त्रिया व मुली यांचे अनैतिक व्यापारास प्रतिबंधक कायदा कलम १९५६ चे कलम ३, ४, ५, ७, ८ प्रमाणे गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पो. नि. हनुमंतराव गाडे हे करीत आहे. सदरची कारवाई ही अहमदनगरचे पोलिस प्रमुख मनोज पाटील, श्रीरामपूर येथील अप्पर पोलिस अधीक्षक श्रीमती डॉ. दिपाली काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी संदिप मिटके यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस स्टेशनचे पो. नि. हनुमंतराव गाडे, स. फौ. राजेंद्र गायकवाड, स. फौ. राजेंद्र आरोळे, पोहेकॉ अण्णासाहेब चव्हाण, पोहेकॉ सुरेश औटी, पो. ना. राधिका कोहकडे, पो. कॉ रविंद्र मेढे, पो. कॉ. सुनील शिंदे, सचिन लोंढे, सचिन ताजने यांनी केले.
No comments:
Post a Comment