नेवासा तालुक्यातील तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून पसार झालेला आरोपीला नेवासा पोलीस स्टेशन अंतर्गत कुकाणा दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी जेरबंद केला आहे.याबाबद अधिक माहिती अशी की 6 जानेवारी 2021 रोजी अज्ञात चोरट्याने तेलकुडगाव येथील चैतन्य नागनाथ मंदिरातील दानपेटी फोडून अंदाजे 17 हजार रुपयांची चोरी केली होती.याबाबद नेवासा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.
याबाबद नेवासा पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.या गुन्ह्याचा तपास सुरू असतांना गुरुवार दि.21 रोजी सांयकाळी खबऱ्या मार्फत या घटनेतील संशयित आरोपी पाचुंदा शिवारात असल्याची माहिती कुकाणा दुरक्षेत्रातील पोलीस कर्मचाऱ्यांना मिळाली.
त्यानुसार उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन मुंढे यांचे मार्गदर्शनाखाली व सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर यांचे सुचनेने कुकाणा दुरक्षेत्रातील हे.कॉ.बाळकृष्ण ठोंबरे, पोलीस नायक राजेंद्र केदार,पो.कॉ.अंबादास गीते,नितीन भताणे,अमोल बुचकूल यांचे पथकाने पाचुंदा शिवारात सापळा लावून संशयित
आतिष लाजरस शिंदे (वय 23 वर्षे) रा.पाचुंदा,ता.नेवासा यास ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसानी त्याला अटक करून न्यायालयापुढे हजर केले असता तुला 4 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. पुढील तपास पो.ना.राजेंद्र केदार करीत आहेत.
No comments:
Post a Comment