अवैधरीत्या दारूची वाहतूक करणारे वाहन पकडले,पुणे राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; संगमनेरचे राज्य उत्पादन शुल्क विभाग झोपेत, अंदाजे६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त.
संगमनेर (शाविद शेख) - संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग हिवरगाव पावसा टोल नाक्यावर अवैध रित्या दारूची वाहतूक करणारी बोलेरो पिकप पकडल्याची घटना मंगळवार दिनांक १९ जानेवारी रोजी ९:३० वाजेच्या सुमारास घडली. या कारवाईमध्ये सुमारे ६ लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेर या ठिकाणी येऊन पुन्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग कारवाई करत आहे तर संगमनेर येथील राज्य उत्पादनशुल्क विभागाचे अधिकारी झोपेत आहेत की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
संगमनेरनेर याठिकाणी येवून पुणे येथील राज्य उत्पादन शुल्क विभाग अवैद्य रीत्या दारूची वाहतूक करत असलेल्या वाहनावर कारवाई करत असेल तर संगमनेर या ठिकाणी असलेले राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी करतात तरी काय की नुसतेच हातावर हात धरून बसलेले आहेत का? तसेच अवैध दारू विक्री करणाऱ्या व वाहतूक करणाऱ्या यांच्यासोबत संगमनेर येथील उत्पादन शुल्क विभागाचे काही संगनमत आहे की काय असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या हिवरगाव पावसा टोल नाका येथून एम एच ४१ एजी ०६२० या गाडी मधून अवैधरित्या दारूची वाहतूक केली जात असल्याची माहिती पुणे येथील उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक विभागीय भरारी पथकाचे अधिकारी दिगंबर शेवाळे यांना समजली होती. ही माहिती समजताच त्यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक गायकवाड, पोलीस नाईक प्रताप कदम, अहमद शेख, अमर कांबळे, शशांक झिंगरे यांच्या पथकाला वरील गाडी मध्ये जास्त अवैध रित्या दारूच्या बाटल्या दाबलेल्या अवस्थेत वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले.
व्हिडीओ 👇
याबाबत दिगंबर शेवाळे यांनी सांगितले की, सदर गाडी ही गुजरात हुन आळेफाटा येथे दारूची अवैध रित्या वाहतूक करत असताना ही गाडी पकडण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment