पुणे - आलिशान सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून जेरबंद - C 24Taas 24Taas Marathi Live News

ब्रेकिंग न्युज

Saturday, January 16, 2021

पुणे - आलिशान सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून जेरबंद

 पुणे - आलिशान सोसायटीचा सुरक्षारक्षकच निघाला चोर, विमानतळ पोलीस ठाण्याच्या तपास पथकाकडून जेरबंदसौरभ कुंदेन हे त्यांचे कुटुंबीय मरीबल बिल्डिंग न्याती एटिवा डी. पी. रोड लोहगाव या आलिशान सोसायटीत राहत आहेत. ते दिनांक 30 डिसेंबर सायंकाळी५ वाजता आपल्या वडिलांना भेटण्यासाठी कुटुंबियासह कात्रज येथे गेले होते. ते राहत असलेल्या घरी कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घरात प्रवेश करून बेडरूममधील कपाटात ठेवलेले २५ तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले.३१ डिसेंबर संध्याकाळी वाचता कुंदेन कुटुंबीय घरी परतले असता कपाटात ठेवलेले २५ तोळे सोने कपाटात नसल्याचे आढळले. त्यांनी याबाबत विमानतळ पोलीस ठाणे पुणे येथे तक्रार दाखल करून दिनांक जानेवारी रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
विमानतळ पोलिस ठाण्याच्या तपास पथकाने दाखल गुन्ह्यातील अज्ञात आरोपीचा तपास करत असताना तांत्रिक गोपनीय माहितीच्या आधारे फिर्यादी वास्तव्यास असलेल्या न्याती एविटा सोसायटीत पूर्वी सुरक्षा रक्षक म्हणून काम करणारा संतोष उर्फ लारा काशिनाथ जाधव वय ३५,(रा. पोरवल रोड लोहगाव पुणे) याच्याकडे कसून चौकशी केली असता सदर गुन्हा त्यांनीच केल्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार संतोष उर्फ रॉकी अरुण धनवजीर वय ३४( रा. निंबाळकर नगर, लोहगाव, पुणे.) याच्या मदतीने घरफोडी करून चोरलेले दागिने सातारा येथील सोन्या चांदीचा व्यापारी अशोक गणेशलाल जानी वय ५४(रा. शनिवार पेठ सातारा) यास विकल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करून त्यांना अटक करून त्यांच्याकडून २० तोळे सोने किंमत १०,००,०००/-(दहा लाख रुपये) हस्तगत करण्यात आले. सदर आरोपींनी अशा प्रकारचे आणखी गुन्हे केली असल्याची शक्यता असल्याने त्यांच्याकडे अधिक तपास विमानतळ विमानतळ पोलिस करीत आहेत.
सदरची कारवाई ही नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, पंकज देशमुख पोलीस उपायुक्त परी-०४ पुणे शहर, किशोर जाधव सहा. पोलीस आयुक्त येरवडा विभाग पुणे शहर, मंगेश जगताप पोलीस निरीक्षक (गुन्हे) विमानतळ पोलिस स्टेशन पुणे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक गिरी, पोलीस स्टाफ अविनाश शेवाळे, अशोक आटोळे, उमेश धेंडे, रमेश लोहकरे, विशाल गाढे, संजय आढारी, विनोद महाजन, सचिन भिंगारदिवे, नाना कर्चे, हरुण पठाण, राहुल मोरे, किरण अब्दगिरे, वैभव खैरे यांच्या पथकाने केली.

No comments:

Post a Comment